राजकीय
शिरूर लोकसभेसाठी महायुतीकडून शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी निश्चित?
बोभाटा न्युज– आगामी लोकसभा निवडणुकीत महायुती कडून शिरूर लोकसभा मतदार संघात जोरदार पडघम वाजत असून काल राजगुरूनगर (ता.खेड)येथे झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यानंतर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनाच उमेदवारी निश्चित झाल्याची चर्चां मतदारसंघात रंगली आहे.
२०२४च्या लोकसभा निवडणुका जवळ येऊन ठेपल्या असून सर्वच पक्षांकडून मोर्चे बांधणीसाठी सुरवात झाली आहे .या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात इंडिया आघाडी व महायुती मध्ये थेट लढत होणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काळात अनेक धक्कादायक घडामोडी होताना दिसल्या परंतु पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील या अनपेक्षित घटना पाहुन आजही जनता आवाक झाली आहे .
परंतु राजकारणात सर्वसामान्य जनतेसाठी वेळ देणारा ,मतदारसंघात जनतेची कामे कारणारा,तरुणाईचे प्रश्न सोडविणारा वेळप्रसंगी रस्त्यावर आंदोलनात काठ्या लाठ्या खाण्याची तयारी ठेवणारा नेता जनतेला प्रिय असतो. यात माजी खासदार आढळराव पाटील यांची मतदार संघात ख्याती आहे. असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवनेरी येथून सुरू केलेले मिशन ४८, शिवसंकल्प अभियान माजी खासदार आढळराव पाटलांच्या शिरूर लोकसभा मतदार संघातून मोठ्या उत्साहात सुरू झाले आहे .या अभियानांतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उपस्थिती तील पदाधिकारी मेळाव्यास मतदारसंघातून प्रचंड पाठींबा मिळाला आहे. शिरूर मतदार संघातील अनेक गावे वाड्यावस्तीवरून आढळराव पाटील समर्थक व शिवसेना पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थित होते. या मेळाव्याच्या माध्यमातून माजी खासदार आढळराव यांनी केलेले शक्ती प्रदर्शन प्रचंड यशस्वी झाल्याचे दिसून आले.
या मेळाव्याच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या मंडपात बसण्यासाठी जागा कमी पडल्याने बहुसंख्य पदाधिकारी व कायकर्ते बाहेर मोकळ्या जागेवर बसून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह अनेक मान्यवरांचे विचार ऐकत होते. या अभूतपूर्व मेळाव्यामुळे मुखमंत्री एकनाथ शिंदे यांना खासदार आढळराव पाटील यांची मतदार संघातील संघटन बांधणी व कार्यकर्त्यांवरील पकड पाहिली त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी मेळाव्याची गर्दी पाहून आगामी लोकसभा निवडणुकीत ४८ पैकी ४५ जागा निवडून आणून पंतप्रधान मोदींचे हात बळकट करण्याचा निर्धार या मेळाव्यात बोलून दाखविताना विरोधकांवर टीकेचे बाण सोडले .
यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की येणाऱ्या प्रत्येक निवडणुकात महायुतीच्या सर्वाधिक जागा निवडून आणल्या पाहिजेत असा निर्धार करत विरोधकांकडे बोलण्यासारखे काहीही नाही. त्यामुळे त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका असे आवाहन त्यांनी केले व ते पुढे म्हणाले की आम्ही काही बोललो तर विरोधकांना पळता भुई कमी पडेल असे म्हणत कोव्हिड काळात मयताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यानी आम्ही काय केले हे आम्हाला शिकवू नये असा टोला त्यांनी आघाडी सरकारला लगावला.या मेळाव्याचे प्रसंगी माजी मंत्री विजय शिवतारे शीतल म्हात्रे जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे प्रकाश वाडेकर यांची मनोगत व्यक्त केले.
दरम्यान या प्रसंगीं बोलताना माजी खासदार आढळराव पाटील म्हणाले की शिरूर लोकसभा मतदार संघ अलीकडे खूपच चर्चेचा विषय ठरला आहे. गेली पाच वर्ष परागंदा झालेले येथील लोक प्रतिनिधी अचानक जागे झाले. आणि त्यांना शेतकरी व कष्ठकऱ्यांच्या व्यथा विषयी कळवळा आला असून ते आता आक्रोश मोर्चे काढून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत.
परंतु त्यांच्या या आक्रोशाला जनता बळी पडणार नाही (उपस्थितांकडून टाळ्यांचा गडगडाट) ते पुढे म्हणाले की मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वावर आमचा विश्वास आहे. महायुतीतील तीन पक्ष जो निर्णय घेतील तो निर्णय मान्य असेल लोकसभेसाठी महायुतीकडून जो उमेदवार या ठिकाणी उभा असेल त्या उमेदवारास प्रचंड मताधिक्याने निवडून आणणारच असा विश्वास खा आढळराव पाटील यांनी बोलून दाखविला.
यावेळी जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, इरफान सय्यद, संघटक अशोक भुजबळ खेड तालुका प्रमुख राजू जोगळेकर, आंबेगाव तालुका प्रमुख अरुण गिरे, युवा संघटक कल्पेश बाणखेले सचिन बांगर, आळंदी शहर प्रमुख राहुल चव्हाण, अमोल अंकुश, शिवाजी राजगुरू यांच्यासह शिरूर लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे शेकडो पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.