राजकीय

शिरुर लोकसभेसाठी खासदार डॉ अमोल कोल्हे यांना पर्याय सत्यशील शेरकर होणार का?

Published

on

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज दुसर्यांदा जुन्नर तालुक्यातील विघ्नहर सहकारी साखर कारखान्यावर येत आहेत. या पुर्वी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्रमामध्ये क्वचितच दिसणारे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फुट पडल्यानंतर दुसर्यांदा हजेरी लावत आहेत. त्यामुळे शरद पवार यांनी कॉग्रेसमधील युवक नेतृत्व सत्यशील शेरकर यांना हेरले आहे. राज्याच्या राजकारणातील समीकरणे पुन्हा बदलल्यास सत्यशील शेरकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शिरुर लोकसभेसाठी निवडणुकीत उतरवणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

शिरुर लोकसभा मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीत डॉ अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांचा ५८ हजार मतांनी पराभव केला. शिवसेनेच्या ताब्यात असणारा हा मतदारसंघ कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळवुन दिला.

तुमच्याकडे साखर कारखाना शिक्षण संस्था नसल्या तरी सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती खासदार होऊ शकतो हे डॉ अमोल कोल्हे यांनी दाखवुन दिल्याने अनेक तरुण राजकारणा प्रती आशावादी बनले आहेत.

राज्याच्या राजकारणातील गणिते बदलली शिरुरचीही बदलणार?.

शिवसेनेमध्ये व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फुट पडली त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघावर आपले वर्चस्व असावे यादृष्टीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार डॉ अमोल कोल्हे यांना पाडणारच.. अशी घोषणा केली आहे. अजित पवार शिरुर लोकसभेसाठी सज्ज आहेत. आपले पुत्र पार्थ पवार यांना शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून निवडुण आणता येईल का? यांची चाचपणी करत आहेत. पार्थ पवार यांना महायुतीची उमेदवारी जाहीर झाल्यास
लोकसभा निवडणूक डॉ अमोल कोल्हे यांना मतदारसंघातच बांधुन ठेवणारी ठरु शकते.

सत्यशील शेरकर यांना शेतकरी हिताचा,कॉग्रेस विचारांचा आणि खासदारांचा वारसा .

सत्यशील शेरकर यांचे कुटुंब विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांशी जोडलेले आहे. या कुटुंबांने कॉग्रेस विचारधारा जपली आहे. सत्यशील शेरकर यांचे चुलते निवृत्ती शेरकर हे खेड लोकसभा मतदारसंघात खासदार म्हणून निवडूण येऊन कार्यरत होते. त्यांचा वारसा सत्यशील शेरकर यांना आहे. शिवाय मराठा समाजाच्या चळवळीत सत्यशील शेरकर कार्यरत आहेत. त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो.

अमोल कोल्हे शिरूर लोकसभा मतदार संघ सोडणार?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साथ सोडल्यानंतर शरद पवार यांच्याकडे मोजकेच लोक शिल्लक आहेत. त्यामध्ये लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राज्यभर प्रचार करू शकेल असे खासदार डॉ अमोल कोल्हे हे एक आहेत.त्यांना शिरुर लोकसभा मतदारसंघात उमेदवारी दिली. तर खासदार कोल्हे यांना मतदारसंघातच थांबावे लागेल . ही बाब लक्षात घेऊन शरद पवार अमोल कोल्हे यांना लोकसभेची उमेदवारी न देता स्टार प्रचारक म्हणून मोठी जबाबदारी देऊ शकतात असे राजकीय जाणकारांचे मत आहे. किंवा शहरी मतदारसंघात लोकसभेची उमेदवारी देऊ शकतात.

एकंदरीत शरद पवार यांचा आजचा पुणे जिल्ह्यातील जुन्नर दौरा पहाता सत्यशील शेरकर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधानसभा निवडणुक लढविण्यासाठी इच्छूक असल्याची चर्चा असताना शिरूर लोकसभा निवडणुकीत खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या ऐवजी सत्यशील शेरकर यांना खासदारकीची गळ घालुन इच्छुकांना धक्का देणार का? हे आगामी काळात पहावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version