सामाजिक
मानद वन्यजीव रक्षकांने वाचवले श्वानाचे प्राण .
डिंभे : नवनाथ फलके :-
चिंचोली ( ता. आंबेगाव ) येथील आश्विनी भालेराव यांनी पाळलेला कुत्रा स्वतः च्या साखळीत जिभ अडकल्याने मृत्युशी झुंज देत असताना घोडेगाव येथील निसर्ग सहास संस्थेचे अध्यक्ष तसेच मानद वन्यजीव रक्षक धनंजय कोकणे यांच्या तत्परतेने व योग्य वेळी केलेल्या उपयाने एका घरेलू श्वानाचे प्राण वाचले .
यावेळी निसर्ग सहास संस्थेचे तसेच वनविभाग घोडेगाव रेक्सू टिमचे टिम मेंबर विलास काळे ‘ सागर कर्पे ‘ तानाजी गाडे ‘ निलेश काळे ‘ तसेच वन्यजीव अभ्यासक व पक्षीप्रेमी नवनाथ फलके यांनी तातडीने मदत करून साखळीत अडकलेल्या कुत्राची जीभ योग्य प्रकारे प्रयत्न करून बाहेर काढली . यामुळे सदर श्वानाचे प्राण वाचले .
चौकट : आंबेगाव तालुक्यात पशुवैदयकीय डॉक्टरांची संख्या भरपूर असून ती फक्त नावालाच आहे . या लोकांच्या हलगर्जीपणामुळे आंबेगाव तालुक्यातील पाळीव प्राणी धोक्यात आले आहेत . अनेक श्वानांना योग्य वेळी लसीकरण न केल्याने पिसाळले तसेच चावा घेणे प्राणास मुकणे या घटना वाढत आहे १ ) पशुधन ‘ पाळीव प्राणी ‘ वन्यजीव ‘ पक्षी यांना वाचविण्यासाठी आम्ही जीवाची बाजी लावतो . मात्र त्यांना वाचविण्यासाठी वनविभागाने दिलेल्या अपुर्या सोयीनमुळे अनेक आडचणी येतात . यामुळे सदर विभाने या सर्व घटनांचे गांभिर्य लक्षात घेऊन योग्य ती प्रणाली रेक्सू टिमला दयावी . यामुळे आपत्तीजन्य घटकांत ती वापरता येवू शकते ( धनंजय कोकणे मानद वन्यजीव रक्षक पुणे )
२ ) अपघात ग्रस्त प्राणी ‘ पशू पक्षी . यांना वाचविण्यासाठी खर्या अर्थाने शासनाने पशुवैदयकीय डॉक्टर महत्वाचे असतात . मात्र या लोकांच्या हलगर्जीपणाने अनेकवेळा यांना आपले प्राण गमवावे लागते . वनविभाने रेक्सु टिमला योग्य ती प्रणाली दिली तर तालुक्यात अश्या अपत्तीजन्य घटकांत तत्काळ मदत देवू शकतो ( नवनाथ फलके वन्यजीव अभ्यासक व पक्षी प्रेमी )