राजकीय

म्हाडा पुणे विभागाचे अध्यक्षपदी माजी खासदार आढळराव यांची निवड , शिवसैनिकाकडून आनंद व्यक्त

Published

on

मंचर:पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडाच्या अध्यक्षपदी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची नियुक्ती राज्य शासनाने केली आहे. त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा असणार आहे. त्यामुळे शिवसैनिकामध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे

एकेकाळी वळसे पाटलाच्या विरोधात बंड पुकारून भीमाशंकर सह साखर कारखान्याच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन समाज कार्याच्या हेतूने प्रभावित होत शिवसेनेत प्रवेश करून लोकसभाची निवडणूक लढवून शिवसेनेचा भगवा दिल्लीत फडकविणातरे शिवाजीराव आढळराव तब्बल तीन वेळा खासदार राहिले शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे सोबत राहून .मागील वर्षभरात राज्य सरकारच्या माध्यमातून त्यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आणला आहे.दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने त्यांची आज महाडाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाचे सहसचिव अजित कवडे यांनी जीआर काढला आहे. राज्य शासनाचे महत्त्वाचे महामंडळ आढळराव पाटील यांना मिळाले असून त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा असणार आहे.आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवाजीराव आढळराव पाटील प्रबळ दावेदार असून म्हाडाचे अध्यक्ष पद मिळाल्याने अधिक वेगाने कामे होतील अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी दिली आहे. दरम्यान प्रादेशिक मंडळाचे कामकाजाबाबत धोरण आखणे, आढावा घेणे, नियंत्रण करणे, प्रादेशिक मंडळाच्या प्रकरणासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेणे, प्रधानमंत्री आवास योजना आदी कामे म्हाडाच्या माध्यमातून करता येणार आहे.

शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले गौरगरिबांना स्वस्तात घरे मिळवून देणे, घरनिर्मितीचा लाभ मिळवून देणे तसेच जास्तीत जास्त लोकांना म्हाडाचा लाभ मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच राज्य सरकारने जो विश्वास दाखवला त्याबद्दल त्यांचे आभार. दरम्यान आढळराव पाटील यांच्या निवडीबद्दल त्यांचे शिरूर लोकसभा मतदारसंघातून विविध स्तरावरून अभिनंदन केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version