अध्यात्मिक
ग्रामदैवत श्री मुक्तादेवी मंदिर पुन;प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्याचे उत्साहात दिमाखदार आयोजन
नारोडी (ता. आंबेगाव) येथे गावचे ग्रामदैवत श्री मुक्तादेवी मंदिर पुन ; प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमानिमित्त तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर नियोजित कार्यक्रमाला सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री मुक्तादेवी ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष संतोष नामदेवराव पिंगळे व समस्त ग्रामस्थ नारोडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
सदर नियोजित कार्यक्रमात सोमवार दिनांक १९ रोजी सकाळी ९ ते कलश शोभायात्रा, दुपारी १ ते ३ अन्नप्रसाद, सायंकाळी साडेपाच वाजता श्री मुक्ताई स्मरणिका प्रकाशन सोहळा, सायंकाळी सहा वाजता देवी महात्म या विषयावर पंडित प्रसाद जोशी यांचे प्रवचन, सायंकाळी सात ते नऊ वाजता ह भ प कृष्ण महाराज राऊत यांचे कीर्तन व रात्री नऊ ते दहा अन्नप्रसाद , त्यानंतर मंगळवार दिनांक २० रोजी सकाळी ८ ते १० धार्मिक विधी, दुपारी एक ते तीन अन्नप्रसाद, सायंकाळी सहा ते सात देवी महात्म या विषयावर पंडित प्रसाद जोशी यांचे प्रवचन, सायंकाळी सात ते नऊ ह भ प महंत उद्धवजी महाराज मंडलिक यांचे कीर्तन, रात्री नऊ ते दहा अन्नप्रसाद, त्यानंतर बुधवार दिनांक २१ रोजी सकाळी आठ ते दहा धार्मिक विधी, पावणे बारा वाजता परमपूज्य स्वामी विद्यानृसिंह भारती यांच्या हस्ते कलशारोहन व त्यांचे प्रवचन, साडेबारा वाजता पूर्णाहुती, महानैवेद, महाआरती, दुपारी एक वाजता महाप्रसाद, सायंकाळी ह भ प पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे कीर्तन व रात्री नऊ ते दहा अन्नप्रसाद असा कार्यक्रम सोहळा संपन्न होणार आहे.