महाराष्ट्र
घोडेगाव येथील न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये पारंपारिक पद्धतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी
किशोर वाघमारे-
न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल घोडेगाव येथे विद्यार्थ्यांनी पारंपारिक पद्धतीने शिवजयंती साजरी केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अतुलनीय कार्याची गाथा सांगणारे कार्यक्रम यावेळी सादर करण्यात आले. सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे सर्व पारंपारिक पेहराव करून कार्यक्रमास उपस्थित होते. शिव जन्मापासून ते राज्याभिषेक सोहळा दर्शवणारे विविध कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले. पोवाडा व पाळणा गायन करण्यात आले. *“गड आला पण सिंह गेला”* हि नाटिका सादर करण्यात आली.. विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, बाल संभाजी, राजमाता जिजाऊ, मावळे,यांची वेशभूषा धारण केली होती.
दरम्यान कार्यक्रमाचे सुरुवातीला आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष श्री तुकाराम काळे, विद्यालयाचे चेअरमन श्री बाळासाहेब काशिनाथ काळे, संस्थेचे संचालक व उपसरपंच श्री सोमनाथ भाऊ काळे, तसेच विद्यालयाच्या प्राचार्या मेरी फ्लोरा डिसोजा, उपप्राचार्या रेखा आवारी, पालक शिक्षक संघाच्या संगीता नांगरे, पर्यवेक्षिका वंदना वायकर यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक काढण्यात आली.प्री प्रायमरी विभागातील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले.
कार्यक्रमासाठी विद्यालयाचे कला विषयाचे शिक्षक श्री समीर मुजावर यांनी सुंदर देखावा साकारला होता. याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी अनुष्का जाधव हिने केले तर प्रास्ताविक सुषमा फलके यांनी केले.
प्राचार्यांनी आपल्या भाषणातून शिवजयंती साजरी करून शिव विचार आत्मसात करावे असे सांगितले. केवळ एक दिवसापूर्वी शिवजयंती साजरी न करता आपण आपल्या जीवनात शिवाजी महाराजांचे विचार धाडस कर्तृत्व तसेच जिजाऊंचे संस्कार आपण अंगीकारले पाहिजेत, निस्वार्थपणे समाजाची व देशाची सेवा केली पाहिजे, असे रेखा आवारी यांनी सांगितले. या कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक वर्ग यांचे बहुमोल सहकार्य लाभले.