राजकीय
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उद्धव ठाकरे गटाचे तालुका प्रमुख दत्ता गांजाळे यांचे मंचर येथे अन्नत्याग आंदोलन : आंदोलनास वाढता पाठिंबा
आंबेगाव तासलुक्यातील शेतकऱयांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाचे तालुकाप्रमुख दत्ता गांजाळे यांनी मंचर (ता.आंबेगाव) येथील छत्रपती शिवाजी चौकात अन्नत्याग (उपोषण) आंदोलन सुरू असून आंदोलनास तालुक्यातील शेतकऱयांकडून प्रचंड पाठींबा मिळत असून आंदोलनास कोंब्रेड अजित अभ्यंकर यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला
आंबेगाव तालुक्यात ग्रामीण भागात सुरू असलेला विजेचा लपंडाव विजेचा शेतीसाठी पुरवठा दिवसा बँद , त्यामुळे जीवावर उदार होऊन शेतीला पाणी देण्यासाठी शेतकऱयांची धावपळ, बिबट्याचे मानवी वस्तीवर हल्ले,कांदा निर्यात बंदी,वाढीव पाणीपट्टी, दुधाचे पडलेले दर अशा अनेक मागण्यांसाठी शिवसेना (ठाकरे) गटाकडून बेमुदत अन्नत्याग आंदोलन तालुकाप्रमुख दत्ता गांजाळे यांनी सुरू केले असून शेतकरी वर्गातून या आंदोलनास पाठींबा वाढत आहे
दरम्यान शेतकऱ्याला आपण सर्वांचा पोशिंदा म्हणतो पण या बळीराजाच्या व्यथा जाणतो का? अनेक अडचणींचा सामना या शेतकऱ्यांना करावा लागत असल्याने हा बळीराजा आज पूर्णपणे मेटाकुटीला आला आहे कारण शेतकरी जे धान्य पिकवतो त्यासाठी येणारा खर्च सुद्धा निघणे अनेक वेळा कठीण होते त्यामुळे जगाचा पोशिंदा म्हणाला जाणारा शेतकरी आज खरोखरीच दुबळा होऊ लागला आहे. याला कारण म्हणजे शेतीसाठी लागणाऱ्या वस्तूंची भाववाढ ही सर्वात महत्वाची म्हणावी लागेल कारण शेतमालाला भाव वाढला की कंपन्या आपली खते, औषधांचे भाव वाढवितात याचा परिणाम शेतकऱ्याने प्रचंड मेहनतीने पिकविलेल्या पिकाचे नफयाचे पैसे कंपन्याच अप्रत्यक्षपणे घेऊन जातात. जसे शेतमालात होते तसे दूध व्यवसायातही होते तेजीच्या काळात दुधाला लिटरला एक रुपयाने भाव वाढला की पशुखाद्य कंपन्यांचे पशुखाद्याला किलोला दहा रुपयांनी भाव वाढतात मागील वर्षी दुधाचे भाव वाढले तसतसे पशुखाद्याचेही दर वाढले परंतु जेव्हा दुधाचे दर कमी झाले त्यावेळी मात्र कोणत्याही कंपनीने पशुखाद्याचे दर कमी केले नाही त्यामुळे शासनाने शेतमालाला किंवा दुधाला भाव वाढवून देताना खते ,बी बियाणे व पशुखाद्या यांच्या दारावरची नियंत्रण आणणे गरजेचे आहे
आंबेगाव तालुक्यात मागील काळात अवकाळी पावसांमुळे शेतकऱयांचे प्रचंड नुकसान झाले आहे पीकविमा शासनाने लागू केला परंतु त्यात असणाऱ्या जाचक अटीमुळे शेतकरी पिकविम्यापासून वंचित आहे यातील जाचक अटी शीथील कराव्यात त्याच प्रमाणे खेड, जुन्नर, आंबेगाव हा भाग बिबट प्रणव क्षेत्र आहे या ठिकाणी उसाचे क्षेत्रही जास्त असल्याने बिबट्यांना उसाच्या शेतात राहण्यासाठी चांगली जागा मिळते संध्याकाळी रात्री हे बिबटे भक्ष्याचे शोधात बाहेर पडतात दिवसभर विजेचा लपंडाव असल्याने नाईलाजास्तव बळीराजाला रात्रीचे वेळी पिकांना पाणी द्यावे लागते त्यामुळे बिबट्याचे हल्ले झाल्याच्या काशी घटना मागील काळात घडल्या आहेत त्यामुळे बलराजा सुरक्षित राहावा यासाठी दिवसा शेतीपंपांना लाईट द्यावी त्याचबरोबर बिबट्याच्या हल्ल्यात बळी अथवा जखमी पडलेले पशुधन धनाची नुकसान भरपाई तातडीने दिली जावी, ऊस शेती हे बिबट्याचे राहण्याचे ठिकाण असल्यामुळे जन्मलेली सर्व पिल्ले जिवंत राहतात त्यामुळे बिबट्याची संख्या झपाट्याने वाढत आहे त्यामुळे यावर नियंत्रण येण्यासाठी बिबट्याची नसबंदी करावी बिबट प्रणव क्षेत्रात गावोगावी प्रभोधात्मक शिबिरे मेळावे घेऊन जनजागृती करण्यात यावी, तसेच पिंजऱ्याची संख्या वाढवावी, केंद्र शासनाने कांद्यावरील निर्यात बंदी मागे घ्यावी, कांदा अनुदान शेतकऱ्यांना तातडीने मिळावे, पाटबंधारे विभागाकडून शेतकर्याना लावण्यात असलेली पाणीपट्टी मोठी असुन संपूर्ण पाणीपट्टी रद्द करावी,