क्रीडा
घोडेगाव येथील न्यू इंग्लिश स्कुल चा साई वामन व जय शहा मॉडेल मेकिंग स्पर्धेत तृतीय तर अनामिका हि निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांकावर विजयी
आयुका या संस्थेच्या वतीने नॅशनल सायन्स डे प्रोग्राम फॉर रुलर स्कूल या स्पर्धा अवसरी (ता.आंबेगाव) येथे उत्साहात पार पडल्या या स्पर्धवसाठी तालुक्यातील अनेक शाळांनी भाग घेतला होता आयुका संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या
या स्पर्धानमध्ये इतर सुमारे 20 त्व २५ शाळातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेसाठी घोडेगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांनी देखील सहभाग नोंदविला यात इयत्ता नववीचे विद्यार्थी साई जितेंद्र वामन व जय महेश पटेल या विद्यार्थ्यांनी मॉडेल मेकिंग या स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला तर कुमारी अनामिका अरविंद काळे या विद्यार्थिनीने निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावून यश संपादन केले
दरम्यान सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणारे शाळेचे शिक्षक कैलास जाधव व श्रीमती हुदा शेख यांचे आणि प्राचार्य व उप प्राचार्य यांचे संस्थेच्या संचालक मंडळाकडून व घोडेगाव ग्रामस्थांकडून अभिनंदन केले जात आहे