शैक्षणिक
घोडेगाव येथे मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा,’ ग्रंथ दिंडीच्या मिरवणूकीचे आजोजन’
घोडेगाव- (किशोर वाघमारे यांजकडून) दरवर्षीप्रमाणे याही वर्षी घोडेगाव(ता.आंबेगाव)येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये मराठी राजभाषादिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी घोडेगावचे नवनिर्वाचित विद्यमान उपसरपंच कपिल (भाऊ) सोमवंशी यांचे समवेत, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री .हेमंतभाऊ काळे , मुख्याध्यापक श्रीमती अलका चासकर शिक्षक वृंद श्री .राजाराम काथेर ,सौ. सुनीता घोडे , सौ. ललिता तुरे सौ .नंदा केंगले सौ .रोहिणी घोडेकर सौ .निलम सूर्यवंशी इत्यादी मान्यवर उपस्थित होते
दरम्यान उपसरपंच सोमवंशी यांच्या हस्ते “कुसुमाग्रज” यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पमाला अर्पण करण्यात आला . हेमंत काळे यांनी ग्रंथ दिंडीचे पूजन केले.तर कुमार तन्मय घोडे या विद्यार्थ्याना मराठी भाषेचे महत्व व जपणूक करणे गरजेचे असल्याचे आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले .कपिल सोमवंशी यांची उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने अध्यक्ष हेमंत काळे यांच्या हस्ते त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या
दरम्यान विद्यार्थ्यांनी गावातून ग्रंथ दिंडी ची मिरवणूक वाजत गाजत काढली .शाळेच्या सर्व विद्यार्थिनी यावेळी पारंपारिक वेशभूषेत व विद्यार्थी फेटे बांधून मिरवणुकीत सहभागी झाले होते.