शैक्षणिक
व्यवहार ज्ञान वाढीसाठी घोडेगाव न्यू इंग्लिश स्कुलचा विद्यार्थ्यांसाठी अनोखाप्रयोग
आजच्या युगात पुस्तकी ज्ञानासह व्यावहारिक ज्ञान अतिशय महत्वाचे आहे असे अनेक वेळा आपण अनेकांकडून ऐकतो हेच व्यावहारिक ज्ञान विद्यार्थ्यांमध्ये वाढीस लागावे त्यांचा आत्मविश्वास बळकट होऊन या जगात त्यांनी सक्षम होण्यासाठी पुस्तकी ज्ञानासोबत व्यावहारिक ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावे म्हणून घोडेगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल या शाळेमध्ये अनेक विद्यार्थी उन्नतीचे कार्यक्रम घेतले जातात
दरम्यान याच हेतूने न्यू इंग्लिश मिडीयम स्कूलच्या इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष बाजारात जाऊन खरेदीचा आनंद घेतला. इयत्ता तिसरी व चौथीचे विद्यार्थी घोडेगाव येथे शुक्रवारी भरणारा आठवडी बाजारात जाऊन त्यांनी विविध भाज्यांची खरेदी केली. यामध्ये विद्यार्थ्यांना संवाद कौशल्य, पैशाचे व्यावहारिक ज्ञान, प्रत्यक्ष खरेदी करतानाचा अनुभव, दैनंदिन जीवनात मालाची निवड, मालाची प्रत, वजन कसे पहावे, त्याचा हिशोब कसा करावा याबाबतचे कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये विकसित व्हावे या हेतूने या बाजारातील भेटीचे आयोजन केले होते.
या क्षेत्रभेटीसाठी विद्यार्थ्यांना सौ वंदना वायकर, श्रीमती सुषमा थोरात , सौ प्रज्ञा घोडेकर व श्रीमती सुषमा घोलप या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. तसेच क्षेत्रभेट झाल्यानंतर शाळेच्या प्राचार्या श्रीमती मेरी फ्लोरा डिसोजा, तसेच उपप्राचार्या रेखा आवारी यांनी विद्यार्थ्यांना आलेल्या अनुभवाचा आढावा घेतला व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.