राजकीय

उपमुख्यमंत्री अजित पवार आजोजित सभेतून आंबेगावतील मतदारांची नाराजी दूर करण्यात यशस्वी होतील का?

Published

on

द्रोणाचाऱयांना गुरू मानून आपल्या गुरुची मातीची मूर्ती तयार करून त्या मुर्ती समोर शस्र व शास्त्र याचा अभ्यास करून पारंगत झालेल्या गुरूच्या पहिल्या भेटीत गुरूंना गुरुदक्षिणा म्हणून आपला हाताचा आंगठा देण्याची तयारी ठेवणारे एकलव्य सारखे स्रेष्ठ शिष्य या भूमीत जन्माला आले.

  परंतु गुरू कडून सर्व विद्या घेऊन ऐन प्रसंगी गुरूला साथ देण्या ऐवजी  शरद पवारांसारख्या  गुरुची साथ सोडून पळ काढनाऱ्या वळसे पाटलांना तालुक्यातील जनता माफ करणार का? हा मोठा चर्चेचाविषय आहे त्याही आगोदर आपली उत्कृष्ठ प्रतिमा असतानाही हा निर्णय का घ्यावा लागला ?असेल या विषयी ही आंबेगाव कारांच्या मनात सारखे प्रश्न गोंगावत आहेत

राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर आंबेगाव तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील  काहीही झाले ‘तरी पवार साहेबांची साथ सोडणार नाहीत असे ठाम पणे आंबेगावचीच नव्हेतर महाराष्ट्रातील जनता सांगत होती. यात वळसे पाटील एकवेळ राजकारण सोडतील पण पवार साहेबांची साथ सोडणार नाहीत असा ठाम विश्वास आंबेगाव तालुक्यातील जनतेला होता.

परंतु झाले उलटेच अजित पवारांच्या सत्तेत सहभागी होण्याच्या घोषने नंतर पहिल्या फळीतच वळसे पाटलांनी पवारांना घराचा आहेर दिला व वळसे पाटलांनी पवार साहेबांची साथ सोडत सत्तेच्या तंबूत कूच केले  त्यामुळे अनेक चर्चांना उधान आले कधी नव्हे ते विश्वास घाताचा उल्लेख आंबेगावकर जनतेला सहन करावा लागणार या विचाराने आंबेगावच्या मतदार व कार्यकर्ते सैरभैर झाले आंबेगावकरी जनते समोर विश्वास घाताचा नवा आदर्श मांडला जातोय आपण आपल्या पुढील पिढीला काय आदर्श सांगणार यामुळे नागरिक प्रचंड नाराज झाले पण बोलणार कुणाला यामुळे सर्व गप्पा राहून आपापसात  जमेल तशी चर्चा सर्वत्र मतदारांतून केली जात आहे.

वळसे पाटील यांचे पवार  साहेबांवर खूप प्रेम आहे व त्यांना आदर्श ठेऊनच वळसे पाटलांनी काम केले आहे.या बाबत आंबेगावकारांच्या  मनात ठाम विश्वास आहे. तरीही वळसे पाटलांनी हा घेतलेला निर्णय घेण्यामागे असे काय घडले असावे की वळसे पाटलांना हा निर्णय घ्यावा लागला कारण वळसे पाटील मिठाचा खडा टाकून आपल्यावर  ज्या व्यक्तीने जीवापाड प्रेम केले आपले संपूर्ण आयुष्य उज्वल केले अशा पितृतुल्य द्रोणाचार्या सारख्या गुरुसमान व्यक्तीची साथ सहजा सहजी सोडणार नाहीत हे ही तितकेच खरे आहे परंतु अशी कोणती घटना घडली असावी की वळसे पाटलांना इतका टोकाचा व आपली प्रतिमा खराब करणारा  वाईट निर्णय घ्यावा लागला  यावर अद्यापही योग्य प्रकाश झोत टाकून कारण मीमांसा देण्यात आलेली नाही.

 त्यामुळे वळसे शरद पवार यांना का सोडले याचे सत्य उघड होणे आवश्यक आहे. कारण वळसे पाटलांनी विकासाचे कारण पुढे करत डिंभे धरणाला बोगदा पाडून पाणी कर्जत जामखेड कडे नेण्याचा रोहित पाटलांचा प्रयत्न असल्याचे जरी सांगितले असले तरी पवार घराणे व वळसे पाटील यांच्यात असलेले ऋणानुबंध पहाता हा मुद्दा तितकासा जनतेला पटणारा मुळीच नाही  मग वळसे पाटलांवर असा कोणता व कसला दबाव आहे किंवा होता. जी त्यांना पवार साहेबाना सोडण्याचा कठीण निर्णय घ्यावा लागला याबाबत आजही आंबेगाव करामध्ये चर्चा आहे.

 दरम्यान अशी चर्चा आहे कि, राष्ट्रवादी पक्ष फुटीच्या या सर्व घडामोडीत  अजित पवारांना पक्षाची सर्व सूत्रे स्वताकडे हवी होती व त्यांनाच मागील काळात पवार साहेबांचा वारसदार बोलले जात होते  पण पक्षाची दोर आपल्या हातातून निसटणार? याची जाणीव झाल्यानंतर त्यांनी विरोधी पक्षाशी हात मिळवणी केली असे एक वेळ म्हटले जाऊ शकते परंतु वळसे पाटलांची अशी कोणतीही मनीषा अथवा महत्वकांशा नव्हती  उलट पवार साहेबांचा मानसपुत्र म्हणून त्यांना ओळखले जात होते. पवारसाहेबासारख्या नेत्याचा सर्वात जवळचा विश्वासू व्यक्ती वळसे पाटील आहेत या बद्दल आंबेगावच्या जनतेच्या मनात वळसे पाटलांविषयी मनोमन मोठा आदर होता मग एव्हडे सर्व सुरळीत असताना सुद्धा असे काय घडले? की वळसे पाटलांसारख्या एकनिष्ठ शिष्यास आपल्या पितृतुल्य गुरुची म्हणजेच शरद पवार यांची अचानक साथ सोडावी लागली  या बाबत आंबेगावच्या जनतेच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत आहेत या आणि अनेक प्रश्नाचा उहापोह सध्या तालुक्यात जागोजागी ऐकावयास मिळत आहे

तालुक्यातील मतदारांमध्ये व जनतेच्या मनात दिलीप वळसे पाटलांची प्रतिमा प्रचंड स्वच्छ आहे वळसे पाटील कोणताही कोणतेही चुकीचे पाऊल टाकणार नाहीत असे असताना काय घडले याबाबत आजही जनता विचार करीत आहे  तसेच त्यांच्यावर कोणी दबाव आणून त्यांना पक्षांमध्ये हा निर्णय घेणे भाग पडले असावे असेही म्हणणे योग्य ठरणार नाही कारण वळसे पाटील एक  मुत्सद्दी व सक्षम नेते आहेत तरीही वळसे पाटलांना हा निर्णय का?घ्यावा लागला असावा हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो काहींच्या  मते वळसे पाटलांचे जवळचे कार्यकर्ते गोवर्धन प्रकल्पाचे सर्वोसर्वा देवेंद्र शाह यांचे व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे गुजरात कनेक्शन याला कारणीभूत असावे असेही म्हटले जाते तरअशीही एक चर्चा सूर सुरु आहे की  मागील काळात वळसे पाटलांना नामविण्यासाठी गोवर्धन प्रकल्पावर गेल्या काळात विनाकारण अनेक चौकशी करण्यात आल्या चौकशीतुन वळसे पाटलांना गोवण्याचाही प्रयत्न केंद्राकडून झाला असावा अशीही   चर्चा तालुक्यात ऐकावयास मिळत आहे.

दरम्यान गोवर्धन प्रकल्पावर तालुक्यातीलच नव्हे तीन तालुक्यातील अनेक कुटुंबे आपली उपजीविका करत आहेत गोवर्धन प्रकल्पामुळे आंबेगाव तालुक्यातील गोरगरींब व सर्वसामान्य शेतकर्याचे अर्थकारण सुरू आहे. मागील काळात या प्रकल्पावर बोट दाखवून बदनाम करण्याचा प्रयत्न झाल्याच्या घटना ताज्या आहेत. असे अनेक प्रश्न तालुक्यातील जनतेच्या मनात   सुरू आहेत पण नक्की ठोस कारणअद्यापही जनतेला ना मिळाल्याने जनता संभ्रमात आहे नजीकच्या पुढील काळात याची उत्तरे समोर येतील अशी अपेक्षा आहे परंतु वळसे पाटलांच्या पवार साहेबांची साथ सोडण्याच्या निर्णयावर आंबेगावचा मतदार कमालीचा नाराज असल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे .

दरम्यान आंबेगाव तालुक्यात नुकत्याच झालेल्या शरद पवार साहेबांच्या सभेला आंबेगाव कारांनी प्रचंड प्रमाणात उपस्थिती दर्शवली होती या सभेनंतर निर्माण झालेल्या अनेक प्रश्नांना आपल्या सभेतुन प्रतिउत्तर देण्यासाठी येत्या चार मार्चला मंचर येथे अजित पवार यांची सभा आयोजित केली आहे परंतु या सभेने आंबेगाव तालुक्यातील जनतेच्या मनातील प्रश्नाची सोडवणूक प्रभावी पणे होईल का? हे हे पाहणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे आयोजित केलेल्या सभेतुन उपमुख्यमंत्री अजित पवार आंबेगाव कारांच्या मनावरील संशयाची जळमटे दूर करण्यात यशस्वी ठरतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

1 Comment

  1. अशोक मोढवे

    March 3, 2024 at 4:54 am

    वळसे पाटील यांना कोणत्याही प्रकारचा धोका नाही कारण त्यांना आंबेगाव तालुक्यात मानणारा वर्ग मोठा आहे निधी मंजूर करण्यात वळसे पाटील कायमस्वरूपी अग्रेसर आहे आता ही शिंदे सरकार मधुन ४००कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात ते यशस्वी झाले आहेत त्यामुळे लोक त्यांना साथ देतील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version