राजकीय
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मंचर येथील होणाऱ्या आजच्या सभेवर मराठा समाज्याचा बहिष्कार,
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मंचर(ता.आंबेगाव)येथील होणाऱ्या सभेवर अखिल आंबेगाव तालुका मराठा समाज्याने बहिष्कार टाकल्यामुळे आजची सभा किती यशस्वी होईल यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे
देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या नुकत्याच झालेल्या मंचर येथील सभेनंतर त्या सभेस उत्तर देण्यासाठी आयोजित केलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्वच राजकीय पक्षांच्या सभेवर बहिष्कार टाकण्याची भूमिका येथील मराठा समाज्याने घेतली आहे
म्हणतात ना….. आधीच उल्हास……. त्यात फाल्गुन मास…. अशी उक्ती वापरली जाते त्याचे प्रमाणे आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे कारण आधीच तालुक्यातील जनतेत नाराजी त्यात मराठा समाज्याचा बहिष्कार त्यामुळे आज होणाऱ्या सभेवरच जणू काही नाराजीचे सावटच पाहावे लागणार की काय अशी चर्चा सुरू झाली आहे
वळसे पाटील यांनी शरद पवारांची साथ सोडल्यानंतर मंचर येथील शिवगिरी मंगल कार्यालय येथील सभेत ना. वळसे यांनी आपल्या पक्ष सोडीची कारण मीमांसा देताना डिंभे धरणाचे पाणी नवीन बोगदा पाडून रोहित पवार पळवत आहेत.त्यामुळे तालुक्याच्या विकासासाठी त्यांनी पवारांची साहेबांची साथ सोडल्याचे जाहीर केले परंतु रोहित पवार यांनी हा आरोप किती धादांत खोटा आहे असे सांगत कागदपत्रे दाखवत वळसे पाटलांच्या त्या आरोपाचे जोरदार खंडन केले होते.
दरम्यान मंचर येथे पार पडलेल्या माजी कृषिमंत्री शरद पवारांनी आपल्या भाषणातून बोलताना माजी आमदार दत्तात्रय वळसे पाटील यांच्या प्रामाणिक पणाचे गुण गायले तर राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे नावही न घेता यांनी केलेल्या विश्वाघाता वर निशाणा साधत जनतेला भावनिक साद घातली होती व त्यात शरद पवार यशस्वी झाल्याचेही दिसत आहे
त्यामुळे कधी नव्हे तेव्हढी दिलीप वळसे पाटील यांच्या विषयी नाराजी तालुक्यात पहावयास मिळत आहे. काही महिन्यांपूर्वी तालुक्यात वळसे पाटलांना पर्याय नाही असा असणारा जनतेचा सूर आता अचानक मोठ्या प्रमाणावर बदलताना दिसत असून आता बदल हवा यावर मतदारांची सकारात्मकता वाढत आहे .त्यादृष्टीने तालुक्यात सर्वत्र बदलाची हवा वहात असल्याचे दिसत आहे.
एकेकाळी वळसे पाटलांचे समजले जाणारे कट्टर कार्यकर्ते आता बदलाची भाषा बोलू लागले आहेत. यावर बोलताना अनेक जण म्हणतात की जे मोठ्या साहेबांना समजू शकला नाही तेथे आपल्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची काय व्यथा….असा नाकारात्मकतेचा सूर सर्वत्र सुरू आहे
तालुक्यासतील मतदारांची विश्वासाहर्ता आता कमी होताना दिसत आहे. त्यामुळे तालुक्याचे आमदार व राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना कधी नव्हे तो आंबेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर विरोध निर्माण होताना दिसत आहे त्यामुळे मागील विधानसभा निवडणुकीत विजयाचे सप्तरंग रंगविणार्ऱ्या वळसे पाटलांना मात्र राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीमुळे घडलेलल्या राजकीय घडामोडीनंतर मोठ्या विरोधाला भविष्यकाळात सामोरे जावे लागणार आहे.अशी चर्चा सुरू आहे
दरम्यान आठव्या विधानसभा निवडणूकीच्या विजयाचा गुलाल अंगावर घेण्यासाठी वळसे पाटील यांना मोठा संघर्ष करावा लागणार आहे याचे स्पष्ट संकेत दिसत आहेत व याचा वाईट परिणाम फक्त विधानसभेवरच नाही तर त्या अगोदर महा युतीच्या लोकसभेच्या उमेदवारांच्या मतावर नक्की पडणार यात शंका नाही