राजकीय
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंबेगाव तालुका जनसंपर्क कार्यालयाचे घोडेगाव येथे उद्घाटन .
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंबेगाव तालुका जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मनसे नेते बाबू वागस्कर यांच्या हस्ते घोडेगाव (ता.आंबेगाव) येथे करण्यात आले यावेळी महाराष्ट्र सैनिकांना मार्गदर्शन करताना बोलले की, “गाव तेथे शाखा आणि घराघरात महाराष्ट्र सैनिक” ही चळवळ आपण सुरू करून येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र निर्माण सेनेला आपल्याला राज्यामध्ये सत्तेमध्ये आणायचे आहे .व राजठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे या प्रसंगी महाराष्ट्र मनसेचे राज्य उपाध्यक्ष संजय जामदार पुणे जिल्हा अध्यक्ष मकरंद पाटे तालुका अध्यक्ष संतोष बोऱ्हाडे . दिनेश बाणखेले उपस्थित होते
वागस्कर पुढे म्हणाले की, येणाऱ्या काळामध्ये मनसे ही जास्त दिवस सत्तेपासून लांब राहणार नाही कारण राज्यामध्ये सुरू असलेली असंतुलित राजकीय स्थिती त्यामुळे महाराष्ट्राची जनता राज्यकर्त्यांच्या कार्यप्रणाली वर प्रचंड नाराज आहे तर मनसे च्या माध्यमातून आपण करीत असलेल्या कार्यामुळे आपली नाळ लोकांशी जुळली असून आपला जनसंपर्क वाढत आहे . सध्याच्या काळात राजकारणाचा जो चिखल झालेला आहे त्या सगळ्यांना वैतागलेली जनता महाराष्ट्र निर्माण सेना आणि राज ठाकरे यांच्याकडे आशेने बघत आहे त्यामुळे आपण लोकांमध्ये कामाच्या रूपाने संपर्कात राहून त्यांना लागेल ती मदत करून त्यांना आपलेसे करण्यासाठी प्रयत्न करावेत .
भविष्यात येणाऱ्या लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद महापालिका, पंचायत समिती असेल किंवा स्थानिक ग्रामपंचायती असतील त्या सर्व निवडणुका महाराष्ट्र निर्माण सेना खंबीरपणे लढवणार आहे. येणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये त्या उमेदवारांना पदाधिकाऱ्यांना मनसे पक्ष पूर्णपणे ताकद देणारा असून त्यांना लागेल ती मदत करणार आहे. तरी आपण सर्व महाराष्ट्र सैनिकांनी या पुढील काळामध्ये लोकांच्या संपर्कामध्ये राहून लोकांना पाहिजे ती मदत करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाव मोठे करावं आणि आपलं नेतृत्व पक्षासाठी आणि गावासाठी तालुक्यासाठी सक्षम असल्याचे सिद्ध करून दाखवावं हे महाराष्ट्र सैनिकांना त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.
या वेळी मनसे तालुका उपाध्यक्ष अशोक शेटे . संतोष गोपाळे . बाबाजी देवडे .सतीश हिंगे शहराध्यक्ष विशाल शिंदे . सागर घुले तसेच पुणे जिल्हा सहकार सेना अध्यक्ष मनोज शेठ खराबी शेतकरी सेनेचे अध्यक्ष योगेश तोडकर आणि ओंकार तुळेकर गणेश आकले मंगेश मेहेर विशाल भगत उमेश काळोखे सचिन बुट्टे मयुरेश लांडे राकेश शेळके इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते