राजकीय
लोकसभेची निवडणूक मी लढविणार नाही ; निस्वार्थीपणे जनसेवा करणे हिच माझी ईच्छा-उद्योजक देवेंद्र शहा
माझ्या वर जनतेचे खूप प्रेम आहे सर्वांच्या भावनांचा मी प्रामाणिकपणे आदर करतो परंतु मी लोकसभा निवडणूक लढविणार नाही, सर्वसामान्यांना मदत करणे त्याच्या अडीअडचनिंना धावून जाणे व जनतेची निस्वार्थी पणे सेवा करणे हा मानवतेचा धर्म आहे.असे मत उद्योगपती देवेंद्र शहा यांनी व्यक्त केले
शिरूर लोकसभा मतदार संघात महायुतीकडून खासदारकीसाठी कोण उमेदवार असावा, याबाबत सर्वत्र चर्चा सुरू असतानाच मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आयात उमेदवारास प्रखर विरोध दर्शविला असल्याचे चित्र दिसत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आयात उमेदवार नको या आशयाच्या पोस्ट करून विरोध करीत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे माजी खासदार शिवाजी आढळराव व प्रदीप कंद या अशा इतर पक्षात असलेल्या उमेदवारांना तिकिटासाठी पक्षात घेण्यासाठी कार्यकर्ते विरोध करीत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान राज्यभरात जरांदे यांच्या आंदोलनानंतर मराठा व ओ.बी.सी.यांच्यात काही प्रमाणात अंतर्गत मतभेत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे त्यामुळे सर्वांना सामावून घेणाऱ्या उमेदवाराचा शोध सद्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून होत आहे
दिलीप वळसे पाटील यांनी ही निवडणूक लढवावी असे संकेत दिले गेले असल्याची चर्चा असून वळसे पाटलांसारखा सक्षम अभ्यासू उमेदवार उभे राहणे गरजेचे आहे परंतु ते निवडणूक लढवत की नाही हे अद्यापही गुलदस्त्यात आहे
दरम्यान अशा अडचणीच्या प्रसंगी लोकाभिमुख नेतृत्व म्हणून मतदार संघातील जनतेची उद्योगपती देवेंद्र शहा यांच्या नावाला पसंती देत आहेत दरम्यान याबाबत देवेंद्र शहा यांनी मात्र आपण खासदारकी किंवा आमदारकी अशा कोणत्याही पदाला इच्छुक नसून राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निस्वार्थी पणे जनतेची सेवा करणार असल्याचर त्यांनी सांगितले
मला कोणत्याही पदाची अजिबात इच्छा नसून माझ्या नावाची चर्चा करून माझ्यावर समाज्याने जे प्रेम व्यक्त केले. हीच माझ्या लोकसेवेची पावती दिली आहे. त्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले व मी निवडणूक लढविणार नाही असे त्यांनी सांगितले