अध्यात्मिक
गोकर्णेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी; व महिला दिन उत्साहात साजरा
मंचर -( राजेश चासकर यांजकडून)
आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील गोकर्णेश्वर मंदिरमंदिरामध्ये याही वर्षी महाशिवरात्री निमित्त हर हर महादेव ,गोकरनेश्वर महादेव भगवान की जय नावाचा जयघोष करीत हजारो शिवभक्तांनी शिवलिंगाचे दर्शन घेतले . त्याचप्रमाणे आज महिला दिनानिमित्ताने या ठिकाणी आयोजित कार्यक्रमात महिला वर्गाने मोठ्या उत्साहात सहभागघेतला तसेच एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प आयोजित लेक माझी लाडकी या योजनेतील लाभार्थ्यांचा सत्कार मंचर गावाच्या माजी सरपंच प्रमिलाताई निर्हाळी, व सविता खरमाळे, सुरेखा दैने, या महिलांच्या हस्ते किट वाटप करून करण्यात आला,
आज सकाळी शिवलिंगावर अभिषेक करून आरती सर्व पूजा पाठ नित्य नियम करण्यात आले, मंडळाची सदस्य मनोज बाणखेले यांनी मंदिराची हुबेहूब प्रतिकृती पुठ्ठा व सुतळ वापरून तयार केली, मंदिराची प्रतिकृती पाहण्यासाठी भाविकांनी प्रचंड प्रमाणावर गर्दी होती, त्याच मरामाणे मंदिरामध्ये महा प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी यावेळी मंडळाचे सदस्य व ग्रामस्थ यांनी मिळून खिचडी चा नैवेद्य महादेवाला अर्पण करून सर्व भाविकांमध्ये परंपरे प्रमाणे त्याचे वाटप करण्यात आले
दरवर्षी नियोजनाप्रमाणे सात दिवस प्रवचन व कीर्तनाचे कार्यक्रम होतात, सर्वजण त्याचा आनंद घेतात, मंडळाचे सदस्य संतोष अर्जुन बाणखेले, रमेश खरमाळे, राजाराम बाणखेले, अरुण नाना बाणखेले, संदीप बाणखेले,नितीन थोरात, गंगाराम भालेराव, बाबू दैने, सचिन दैने, विनोद बाणखेले, जितेंद्र खरमाळे, मंडळाच्या सर्व सभासद उपस्थित होते.