सामाजिक

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस वनराईच्या माध्यमातून 15 संगणक व प्रिंटर प्रदान सोहळा पार पडला

Published

on

आंबेगाव तालुक्यातील गावडेवाडी येथील जिल्हापरिषदेच्या शाळेस  स्वर्गीय मोहन धारिया यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने  वनराईच्या माध्यमातून १५ संगणक व प्रिंटर प्रदान  करण्यात आले.

आजपर्यंत वनराईच्या माध्यमातून गावामध्ये अनेक जलसंधारणाची विविध कामे झालेली असून गाव वनराईच्या माध्यमातून सुजलाम सुफलाम झालेले आहे ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ ही मोहीम गावडेवाडीत राबवल्यामुळे मुबलक प्रमाणात गावच्या परिसरात शेतीसाठी पाणी उपलब्ध झालेले आहे. अनेक छोटे-मोठे  बंधारे घालण्यात आलेले आहे. यामुळे बारमाही पाणी पिकांसाठी उपलब्ध आहे. विविध बागायती पिके, फळझाडांची लागवड या गावांमध्ये झालेली आहे. ‘खेड्याकडे वळा’ हा मोहन धारिया अण्णांनी दिलेला नारा गावकऱ्यांनी पाळून या गावांमध्ये अनेक शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत असून पुन्हा एकदा वनराईच्या माध्यमातून गावामध्ये विकासकामे होत आहेत,

 हे ऋणानुबंध आजपर्यंत टिकून आहेत. गावच्या विकासासाठी हवी ती मदत वनराई करण्यास तयार आहे. लोकसहभागातून नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन करून, गाव आत्मनिर्भर करणे हाच वनराईच्या दृष्टिकोन आहे. असे प्रतिपादन यावेळी वनराईचे सचिव अमित वाडेकर यांनी केले.

यानंतर वनराईचे अधिकारी व ग्रामस्थांनी शिवार फेरी केली, विविध बंधारे यांना भेटी दिल्या,त्यांची स्थिती पाहिली,कोठे दुरुस्ती करायची आहे,आणखी कोठे बंधारे आवश्यक आहे याची पाहणी भूगर्भशास्त्रज्ञ डॉ.अजित वर्तक यांनी केली,

गावच्या विकासात व आदर्शगाव निर्माण करण्यात व गावभेटी च्या माध्यमातुन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव, चंद्रशेखर यांनी या गावाला भेटी दिल्या  यात वनराईने केलेली गावातील जल संधरणाची विविध कामे यामुळे झाले आहे असे गावचे सरपंच विजय गावडे म्हणाले. यावेळी ते असेही म्हणाले की मोहन धारिया यांच्या निधनानंर त्यांच्या हस्त्या या गावात एक वडाचे झाड लावून तेथे पुरण्यात आलेल्या आहेत, या वृक्षाला मोहन छाया असे नाव मोहन धारिया यांच्या आठवणी प्रित्यर्थ देण्यात आलेले आहे,गावच्या प्रवेशद्वारावर हे झाड लावण्यात आलेले आहे.

दरम्यान कार्यक्रमाचे अध्यक्ष पदी सुखदेव गावडे हे होते कार्यक्रमासाठी वनराईचे सेक्रेटरी अमित वाडेकर, प्रोजेक्ट कॉर्डिनेटर राकेश शेलार महाराष्ट्र वन संवर्धिनीचे सचिव व भूगर्भ शास्त्रज्ञ डॉ. अजित वर्तक, गावडेवाडीचे सरपंच विजय गावडे, ज्ञानेश्वर गावडे, माजी सरपंच संतोष गावडे, मनीषाताई गावडे, श्री दत्तगुरु शिक्षण प्रसारक मंडळ चे उपाध्यक्ष श्री सुनील गावडे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष गावडे, उपाध्यक्ष जालिंदर गावडे, हिरकणी विद्यालयाचे मुख्याध्यापक विनोद बोंबले हे उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरविंद मोढवे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन मंदा लोंढे, कल्पना अभंग, स्मिता चासकर, वामन झुर्वे, दिलीप भवारी, रुपाली लाळगे यांनी केले, आभार सुनिल गावडे यांनी मांडले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version