सामाजिक

चित्रपट अभिनेते रवी काळे, कुलगुरू मनोहर चासकर, उद्योजक अरविंद वळसे,  मंगेश शिंदे, व्याख्याता अर्चना भोर यांची”आंबेगाव भूषण पुरस्कार” साठी निवड

Published

on

सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या  युगप्रवर्तक प्रतिष्ठाण वतीने  “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर” यांच्या जयंती निमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या भूमिपुत्रांना  “आंबेगाव भूषण” या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. 

   दरवर्षी प्रतिष्ठानचे वतीने आंबेगाव तालुक्यातील  कला, क्रीडा शौक्षणिक सामाजिक औद्योगिक राजकीय, कृषी आदी क्षेत्रातील नामवंतांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

या वर्षी वर्षी शैक्षणिक क्षेत्रात नांदेड विद्यापीठ चे कुलगुरू व म्हाळुंगे गावचे सुपुत्र  डॉ. मनोहर चासकर साहेब प्रशासकीय सेवेतील उत्कृष्ट कामगिरी बद्दल शिक्षण विभागचे सह सचिव  मंगेश शिंदे सो हे अवसरी बु।। चे भूमिपुत्र आहेत तर  उद्योजकता क्षेत्रात उत्तुंग भरारी मारणारे “रामा ऑटो” चे मालक  मा अरविंद वळसे पाटील याना देण्यात येणार आहे.

आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर गावचे रहिवाशी आहेत. कलाक्षेत्रात चित्रपट अभिनेते व घोडेगावचे सुपुत्र रवी काळे यांची निवड केली आहे. तसेच शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा जागर करणारे युवा व्यख्यात्या अर्चना भोर करंडे याना आंबेगाव भूषण देण्यात येणार आहे.

 भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त रविवार दिनांक १४ एप्रिल २०२४ रोजी घोडेगाव (ता.आंबेगाव) येथे युगप्रवर्तक प्रतिष्ठाण च्या वतीने देण्यात येणार असल्याची माहिती युगप्रवर्तक प्रतिष्ठाण चे संस्थापक अध्यक्ष गौतमराव खरात यांनी दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version