सामाजिक
शिनोली आठवडे बाजारात मतदार जनजागृती फेरीचे आयोजन
राजेंद्र चासकर यांजकडून -आंबेगाव विधानसभा मतदारसंघाच्या आदिवासी भागातील शिनोली(ता.आंबेगाव) येथील आठवडे बाजारात ( दि १९रोजी) मतदार जनजागृती फेरीद्वारे मतदार जनजागृती केल्याची माहिती आंबेगाव मतदार जनजागृती पथकाचे प्रमुख सुनील भेके यांनी दिली.
शिरुर लोकसभा मतदार संघ अंतर्गत (196 )आंबेगाव विधानसभा मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी गोविंद शिंदे व तहसिलदार संजय नागटिळक, स्वीप नोडल अधिकारी सविता माळी यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव विधानसभा मतदार संघात मतदार जनजागृती अभियान सुरु आहे.
दरम्यान येथील भीमाशंकर विद्यालय व ज्युनियर कॉलेज शिनोली येथे मतदार जनजागृती अभियानांतर्गत विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संकल्पपत्र भरून घेणे, शाळेत निबंध, वक्तृत्व, चित्रकला, रांगोळी, विविध प्रकारच्या स्पर्धा घेण्याबाबत शिक्षकांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. आठवडे बाजारातून विद्यार्थ्यांनी ‘मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो’, अशा घोषणा देत येत्या 13 मे रोजी शिरूर लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन केले.
शिनोली परिसरातील मतदारांना यापूर्वी शिनोली आठवडे बाजारात ईव्हीएम व व्हिव्हिपॅट मशिनचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले असून त्याबाबत जनजागृती करण्यात आली आहे. या वेळी मतदार जनजागृती पथकाचे सदस्य सचिन तोडकर, विनायक राऊत, काशिनाथ घोंगडे, तुषार शिंदे, अशोक लोखंडे, राहुल रहाटाडे, नारायण गोरे, सुरेश रोंगटे, अभिजित नाटे, मंगेश जावळे त्याचप्रमाणे. यावेळी भिमाशंकर विद्यालयाचे प्राचार्य श्री.टिकले जे.जी. श्री. गवारी एस.डी.,श्री.मोरे व्ही.एम.श्री. पिंगळे आर.एस.श्री. राऊत एन.डी.श्री.बारवे ए.बी.श्री साबळे एस.जी. श्रीम.गायवळ मॅडम शिक्षक वृंद उपस्थित होते