राजकीय

आंबेगाव तालुक्यात चढ्या दराने स्टॅम्प विक्री करणाऱ्या स्टॅम्प विक्रेत्यांवर कारवाई करा; अन्यथा म.न.से.च्या वतीने आंदोलन छेडणार- जिल्हाध्यक्ष मकरंद पाटे

Published

on

आंबेगाव तालुक्यात स्टॅम्प विक्रते हे वाढीव दराने स्टँप विक्री करत असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणावर मेटा कुटीला आला आहे परंतु प्रशासन मात्र मूग गिळून गप्प असल्याने  या स्टॅम्प विक्रेत्यांवर कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन उभारेल असा इशारा म.न.से. जिल्हा अध्यक्ष मकरंद पाटे यांनी दिला  आहे.

 गेली अनेक दिवसांपासून आंबेगाव तालुक्यात खरेदी खत, संमतीपत्र, या सारख्या अनेक शासकीय कामासाठी लागणारे स्टॅम्प ची विक्री चढ्या दराने होत आहे. 100 रुपये किंमतीचा स्टँप 120 रुपयाला सर्रास विक्री केला जात आहे.जर एखादा व्यक्ती स्टॅम्प ची वाढी रक्कम देण्यास नकार देत असेल तर त्यास स्टॅम्प शिल्लक नाही असे सांगून ग्राहकांची अडवणूक केलीं जात असल्याचा तक्रारी नागरिक करीत आहेत.

 महाराष्ट्र नवनिर्माण रस्ते आस्थापना विभाग तालुका अध्यक्ष  दिनेश बाणखेले  यांनी  तालुक्यात सुरू असलेल्या तक्रारीबाबत काही ठिकाणी चौकशी  केली असता काही विक्रते अशी विक्री करत असलयीचे निदर्शनास आले एकाठिकाणी ठिकाणी त्यांनी शहानिशा केली असता  त्यांच्या समोर एका व्यक्तीला 100 रुपयाचा स्टँप पेपर दिला व त्याच्याकडून 120 रुपयाची मागणी केली असता त्यांना विचारण्यात आले 100 रुपयाचा स्टँप पेपर 120 रुपयास विक्री असल्याचे निदर्शनास आले. 

या बाबत त्यांनी स्टॅम्प विक्रेत्याला विचारले असता त्याने    शिवीगाळ केली व खिशातून मोबाईल हिसकावून घेतला व स्वतःच्या हाताने स्टँप पेपर फाडून व रजिस्टर फाडून त्यांच्याकडे कामाला असणाऱ्या मुलीस त्यांच्या विरुद्ध पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यास सांगत होते असे त्यांनी सांगितले. वास्तविक पाहता जिथे असा काळाबाजार केला जातो आणि सर्वसामान्य लोकांची आणि गरिबांची दिशाभूल अथवा पिळवणूक केली जाते त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा सीसीटिव्ही कॅमेरला नसल्यामुळे असा काळाबाजार राजरोजपणे स्टॅम्प विक्रेत्याकडून  घोडेगाव व मंचर या ठिकाणी केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान सबरजिस्टर घोडेगाव यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वतीने  निवदेन देण्यात आले असून यावेळी सबरजिस्टर यांनी आठ दिवसांत चौकशी करून संबंधित प्रकरणाची चौकशी करून  कारवाई करण्यासंदर्भात  आश्वासन दिले आहे.

दरम्यान यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उत्तर पुणे जिल्हाध्यक्ष मकरंद पाटे यांनी  सादर प्रकरणाची चौकशी करून दोषी स्टॅम्प आठ दिवसात विक्रेत्यांवर कारवाई न झाल्यास   घोडेगाव येथिल सबरजिस्टर कार्यालयासमोर  तीव्र आंदोलन करण्याचा असा इशारा दिला आहे . यावेळी संतोष बोऱ्हाडे ( महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुकाध्यक्ष आंबेगाव तालुका),दिनेश बाणखेले (रस्ते आस्थापना तालुका .अध्यक्ष आंबेगाव तालुका),अशोक शेटे (तालुका उपअध्यक्ष आंबेगाव),विशाल शिंदे (घोडेगाव शहर अध्यक्ष),सागर घुले(मंचर शहर अध्यक्ष) व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version