राजकीय

शिरुर लोकसभेचा हिरो कोण ठरणार “अभिनेता कि कार्यकर्ता, मतदारांमध्ये कमालीची उत्सुकता”

Published

on

एक म्हण सर्वत्र प्रचलित आहे ती अशी  “बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले”  तर सध्या शिरूर लोकसभेत  वस्तूस्थिती मात्र वेगळीच दिसते प्रत्यक्षात नसलेली विकास कामे, गेल्या पाच वर्षात मतदार संघातील जनतेसोबत तसेच कार्यकार्यासोबत संपर्काचा अभाव असल्याचे प्रमुख कारण त्यामुळे निर्माण झालेली नाराजी हे कोल्हेना सध्याचे अडचणीचे ठरणार असे दिसते. 

खासदार कोल्हे हे अभनेते आहेत त्यामुळे त्यांच्या ” बोलण्यातून आव छत्रपतीं कर्तृत्वाचा, “पण प्रत्यक्ष कामात मात्र  नर्मदेचे गुळगुळीत गोटे” या प्रमाणे  अशीच काहीशी स्थिती  सध्याच्या विद्यमान खासदारांची दिसत आहे त्यामुळे शिरूरचा हिरो, हा अभिनेता ठरणार, की जनमानसात असलेला हाडाचा कार्यकर्ता हे लवकरच समजेलशिरूर लोकसभा मतदार संघ सध्या खूपच चर्चेत आहे. या मतदार संघात लढत जुनीच पण वेळ नवी अशीच स्थिती आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत माजी खासदार शिवाजीराव आढळराव व सिने अभिनेता अमोल कोल्हे यांच्यात झालेल्या निवडणुकीत अमोल कोल्हे यांनी आढळरावांचा दणदणीत पराभव केला होता.

 पुन्हा पाच वर्षांनंतर  लोकसभा निवडणुकीत उमेदवार तेच पण फक्त पक्ष व चिन्ह वेगळे ही परिस्थिती असून यानिवडणुकीत कोण बाजी मारणार या कडे सर्वांचेच लक्ष आहे. कारण मागील वेळी खासदार कोल्हे हे नव्या दमाचे व संपूर्ण स्वच्छ प्रतिमा असलेले उमेदवार होते. त्यामुळे ते पाचवर्षात मतदार संघाचे चेहरा मोहरा बदलतो असे आवाहन करत होते व त्यांच्यावर विश्वास ठेवून मतदारांनीही त्यांना संधी दिली

 परंतु आता तशी स्थिती नाही कारण मतदारानी  कोल्हे यांना  बहाल केलेल्या पाच वर्षांचा हिशोब मतदार मागणार हेही तितकेच खरे, आहे. आता माजी खासदार आढाळराव यांचे त्यांच्या कार्यकाळातील विकास कामे तर विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांचे विकास कार्याचा आढावा पाहूनच मतदार संधातील मतदार मतदान करेल अशी स्थिती आहे. 

माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी जनतेसमोर मांडलेली अनेक विकास कामे मतदारांना दिसत आहेत. खेड सिन्नर या रस्त्याचा पाठ पुरावा करून हा रस्ता प्रत्यक्षात आढळराव यांनी आणला परंतु काही महसुली आक्षेपांमुळे व शेतकऱ्यांना व्यवस्थित मोबदला शासना कडून देण्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांना वेळ लागल्यामुळे ही कामे रेंगाळली व त्यातच मागील लोकसभेचे बिबुल वाजले व त्या नाराजीचा तोटा माजी खासदार आढळराव यांना झाला.

 परंतु प्रत्यक्षात मात्र ती कामे आढळराव यांच्याच कार्यकाळातील  होती.हे मतदारांना माहीत आहे. त्याच प्रमाणे मागील निवडणुकीत पराभूत होऊनही माजी खासदार आढळराव यांचा समाज्यातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्याचा जनसंपर्क सातत्याने दांडगा राहिला आहे. त्यामुळे ते सामन्यातील खासदार जाणवतात ही एक आढळराव यांची जमेची बाजू आहे.

याबाबत खासदार अमोल कोल्हे यांची छत्रपती संभाजी महाराज यांची छबी ही मागील निवडणुकीत परिणाम कारक ठरली होती. ती छबी राखण्यास खासदार कोल्हे यशस्वी ठरलेले दिसत नाहीत.    

त्याचप्रमाणें  मागील निवडणुकीत खासदार कोल्हे यांनी अनेक आश्वासने दिली होती यात त्यांनी भोसरी ते चाकण दरम्यान असलेली वहातुक कोंडीवर उपाय करून येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासंदर्भात आश्वासन दिले होते. परंतु भोसरी ते चाकण दरम्यान असलेली प्रचंड प्रमाणावरील वहातुक कोंडी व त्यासंदर्भात एकाही उड्डाणपूल निर्मितीच्या कामाचे ते साधे उद्घाटनही करू शकले नसल्यामुळे या भोसरी चाकण परिसरासह खेड जुन्नर आंबेगाव भागातील जनतेला याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहेत.याचा परीणाम यानिवडणुकीत जाणवणार हे नक्की, असे दिसत आहे.

त्याचप्रमाणे खासदार  कोल्हे आज जरी समाज्यात मतदान मागण्यांसाठी दिसत असले तरी गेल्या पाचवर्षात त्यांनी कोणत्याही प्रकारचा भरीव निधी या मतदारसंघातील विविध गावांसाठी आणलेला दिसत नाही. सध्याचा काळात काही ठिकाणी जाहिराती प्रित्यर्थ खासदार कोल्हे यांनी विविध गावात वाहन थांबे बांधून जाहिरात केली आहे. ही कामे तर जिल्हापरिषद सदस्य करतात ही चर्चा मतदारांमध्ये आहे. त्यामुळे खासदार कोल्हे यांना दिलेली मागील  पाच वर्षे फुकट गेली की काय? या मानसिकतेमध्ये सध्या मतदार दिसत आहे.

खासदार कोल्हे यांची बोलण्याची पद्धत त्याची वाक्यरचना खूप अलंकारीक व मनाला भुरळ पाडणारी आहे.तसेच छत्रपती शिवाजी महाराज ,छत्रपती संभाजी महाराज ,श्री राम  श्रीकृष्ण, या सारख्या महान  देवतांच्या बाबत त्यांचे वाचन चांगले दिसते त्यामुळे आपल्या ठेवणीतल्या अलंकारीक शब्दात योग्य पध्दतीने प्रसंगावधान  पणे एखाद्या घटनेचे वर्णन करून आपल्या पांडित्याचे ढोस जनतेला पाजण्यात पाजत असले तरी खासदार अमोल कोल्हे प्रत्यक्ष मतदार संघाच्या विकासाच्या बाबत पूर्ण अपयशी ठरले आहेत अशी मतदार चर्चा करीत आहे. 

खासदार कोल्हे एक अभिनेता असल्यामुळे सेलिब्रिटी यांना पाहण्यासाठी त्यांच्या सभांना लोकांची काही प्रमाणात गर्दी  जरी दिसत असली तरी त्यांच्या “डायलॉग बाजी” मूळे मतदारांची करमणूक होत आहे.हेच चित्र पहावयास मिळत आहे . अनेक ठिकाणी मतदार आपली प्रतिक्रिया देताना “डायलॉग बाजीत संपन्न,पण कामात मात्र नगण्य” असे मत प्रगट करीत आहे. ,  

दरम्यान खासदार अमोल कोल्हे यांनी आपल्या प्रकाशित केलेल्या विकास कामाच्या  पुस्तकात ,” राष्टीय एलिव्हेटेड कॉरिडॉर” , “२६ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल असणारी इंद्रायनी मेडिसिटी” व “आदिवासी भागात रोजगार निर्मिती साठी महत्वपूर्ण असलेली राष्टीय वनौषधी संशोधन संस्था” या सारख्या महत्वपूर्ण प्रकल्पांना मंजुरी आणल्याचा दावा केला असला तरी यातील एकाहीही कामाला प्रत्यक्षात मात्र सुरुवात दिसत नाही. त्यामुळे हे कागदी घोडे नाचविण्याचा एक भूल भुलैय्या चा प्रकार असल्याची टीका ही काही विरोधकांतून केली जातं आहे

दरम्यान  खासदार कोल्हे यांनी मालिकांतून साकारलेल्या  छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिका खूपच गाजल्या व सर्वाना भावल्याही त्याचा परिणाम म्हणून जनतेने त्यांच्यावर विश्वास हि ठेवला. परंतु छत्रपतींच्या कामाचा व  समाजकार्याचा वसा घेण्यास मात्र कोल्हे विसरले  असावेत अशी चर्चा मतदार संघात सुरू असली तरी मतदारांचे त्यांच्याकडे असलेले आकर्षक पहाता त्यांना जनतेचा विश्वास संपादन करण्यात तळागाळातील जनतेला साद घालावी लागेल व त्यात ते खूप समजदार आहेत यात काही शंका नसावी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version