राजकीय
राष्ट्रवादीतील प्रवेशाने माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांचा शिरुर लोकसभेतील यशाचा मार्ग सोपा……
शिरुर लोकसभा मतदार संघात माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मधील प्रवेशाने राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणावर बदलत असून आढळरावांच्या यशाचा मार्ग सुखर होण्याची चिन्हे दिसत आहेत.
माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी शिवसेना (शिंदे गट) सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे शिरुर लोकसभा मतदार संघात वेगवेगळ्या विचार प्रवाहांना सुरवात झाली आहे. अनेक मतदारांच्या मते आढळराव यांनी शिवसेना सोडायला नको होती, अनेकांच्या मते आढळराव यांनी पक्ष बदलाचा घेतलेला निर्णय योग्यच आहे अशाप्रकारच्या विविध चर्चांना मोठया प्रमाणावर उधाण आले आहे. काही जण हे आपले राजकीय समीकरण मांढताना माजी खासदार आढळराव यांना कसा तोटा होईल याचाच विचार मांडत आपली नाराजी काही अंशी व्यक्त करीत आहेत परंतु सध्यातरी शिरुर लोकसभा मतदार संघाचा विचार करता, माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये आपल्या कार्यकर्त्यासोबत प्रवेश करण्याचा घेतलेला निर्णय माजी खासदार आढळराव यांना भावी काळात संसद सदस्य होण्यासाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे.असे अनेकांचे मत आहे.
अनेक मतदारांचे मते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लढवलेल्या मागील २००४ ते २०१९ पर्यंतच्या सर्व निवडणुकांच्या विजयाचा विचार करता व त्यांना मिळालेली मते पहाता विजयी मते मिळण्याचा आलेख खूपच चढता दिसून येतो. तर २००१९ ते २०२४ च्या दरम्यान झालेल्या निवडणुकीत मतदानाचे बाबतीत पाहिल्यास सध्याचे विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना- एकूण मते 634554 इतकी पडली आहेत. तर माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांना- 576002 इतकी पडलेली आहेत. म्हणजेच माजी खासदार शिवाजीराव आढाळराव यांचा मागील निवडणुकीत – 58252 इतक्या मतांनी पराभव झाला. यातील प्रमुख कारणे काही कारणे मतदारांचे मते अशी कि, राजगुरूनगर सिन्नर बायपास हायवे मधील थांबलेली बाह्य वळण रस्त्यांची कामे या वेळी पूर्ण झाली नव्हती. मागील निवडणूक काळात त्यावेळी उत्तर पुणे जिल्ह्यात उन्हाळी सुट्टीचे दिवस सुरू होते त्यातच या परिसरात विविघ गावोगावच्या ग्रामदैवतांच्या यात्रा व त्यात लग्नसराईचे दिवस सुरू होते. त्यामुळे, राजगुरूनगर गाव, खेड घाट, मंचर, नारायणगाव या परिसरात होणाऱ्या वाहातुक कोंडीमुळे नागरिकांमध्ये मोठी नाराजी निर्माण झालेली होती. त्यामुळे खेड जुन्नर आंबेगाव या तीन तालुक्यात हे विरोधी मतदानाचे एक प्रमुख कारण ठरले, त्याचप्रमाणे माजी खासदार आढळराव यांच्या काही महत्वाच्या कार्यकर्त्यांमध्ये आलेली विसंगती व त्यामुळे निर्माण झालेले तणाव , त्याच बरोबर पुढिल उमेदवार एका विशिष्ट्य समाज्याचा असल्यामुळे जातीपातीचे अनुषंगाने राजकारण झाल्याचे बोलले जाते व त्याचाही फटका मतदानावर पडल्याचे बोलले जाते .
त्याच प्रमाणे आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे ज्याचे सहकार मंत्री वळसे पाटील तसेच सोबत इतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी भक्कम मोर्चे बांधणी केली. व त्या तुलनेत आढळरावांकडे सर्व मतदार संघात कार्यकर्ते यांचा संच खूपच अपुरा होता. “म्हणतात ना”, कोणताही खेळ असो व युद्ध जिंकण्यासाठी, वेळेवर योग्य नियोजन करणारे प्रशिक्षित अभ्यासू व्यक्ती असणे आवश्यक असते परंतु यांचा मोठ्या प्रमाणावर अभाव माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्याकडे २०१९ च्या निवडणुकीत दिसून आला. सन२००४ ते २०१८ या दरम्यान झालेल्या पहिल्या तीन निवडणुकांमध्ये शिवसेना सहसंपर्क प्रमुख दिवंगत नेते अविनाश राहणे यासारखी योग्य नेतृत्व करणारी व कार्यकर्त्यांशी जवळून संपर्क असलेली प्रत्येक आपत्कालीन स्थिवर योग्य पर्याय काढणारी मंडळी माजी खासदार आढळराव यांच्यासोबत होती.
पण २०१९ मध्ये असे जवळचे समजले जाणारे अनेक महत्वाचे कार्यकर्ते दुरावले होते तर या संधीचा फायदा घेत तालुक्यातील काही महत्वाच्या कार्यकर्त्यांना माजी खासदार आढळराव यांच्यापासून तोडण्यात नामदार दिलीप वळसे पाटील यशस्वी झाले होते. त्या कार्यकर्त्यांनी आढळरावांची मतदान मिळविण्यासाठी वापरली जाणारी रणनीती व या साठी मतदार संघात आढळराव यांना मदत करणारी शक्तीस्थाने यांची सर्व माहिती वळसे पाटलांना पुरविल्यामुळे (घरचा भेदी लंका ढाय या युक्ती प्रमाणे) शिरुर लोकसभा मतदार संघातून मतदान रुपात मिळणारी रसद रोखण्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यशस्वी झाला .
आंबेगाव तालुका हा आपला बालेकिल्ला व येथील आपले कार्यकर्ते योग्य नियोजन करतील असे समजून, आढळराव यांनी येथील सर्व कामकाजाच्या निर्णयाची जबाबदारी येथील काही स्थानिक कार्यकर्त्यांवर सोडली. त्यामुळे येथेही कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊन मतभेद निर्माण झाले त्यामुळे मतदानात फटका बसला असल्याचे सांगितले जाते. त्यातच पुढील उमेदवार अभिनेता असल्याने व त्याच काळांत विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांची टेलिव्हजन वर सुरू असलेली व सर्वाना भावलेल्या “छत्रपती संभाजी महाराज” मालिकेत विद्यमान खासदार हे “छत्रपती संभाजी महाराज” यांची प्रमुख भूमिका बजावत होते व त्याचाही काही प्रमाणात खासदार अमोल कोल्हे यांना फायदा झाला असल्याचे सांगितले जाते. माजी खासदार आढळराव यांच्या बाबत मगिल वेळी अशी प्रतिकुल स्थिती असतानाही खासदार अमोल कोल्हे यांना मिळालेली विजयी मतांची संख्या पहात एव्हड्या मोठ्या मतदार संघाच्या दृष्टीने खासदार अमोल कोल्हे यांना मिळालेली मतदानाची आघाडी अतिशय नगण्य होती.
दरम्यान आजची स्थिती पाहता सड्याची माजी खासदार आढळराव यांची स्थिती खूपच बळकट आहे. यात प्रामुख्याने पराजय झाल्यानंतरही आढळराव यांनी खचून न जाता पुन्हा नव्या जोमाने कामाला सुरुवात केली. मतदार संघातील प्रत्येक गाव वाडी वस्तीवर जाऊन त्यांनी मतदारांनशी वैयक्तिक संपर्क ठेवला व सर्व मतदार संघ पिंजून काढला.
मुळ शिवसेनेत फूट पडल्यानंतर सर्वत्र राजकीय दृष्टीने दोलायमान परिस्थिती असताना माजी खासदार आढळराव यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे समवेत जाणे पसंत केले व त्यामुळे त्यांनी सत्तेचा फायदा घेत संपुर्ण मतदार संघातील गावोगावच्या करकर्त्यांशी संपर्क ठेऊन योग्य नियोजन करीत सर्व मतदार संघासाठी भरपुर निधी शासमाकडून आणला. त्यामुळे खासदार नसतानाही अनेक गावे वाड्यावस्त्यांवर त्यांनी प्रचंड प्रमाणावर विकासाची कामे मंजूर करून घेतली त्यामुळे एक सकारात्मक लाट माजी खासदार आढळराव यांच्या विषयी निर्माण झाली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुमारे चार व आमदार भाजपाचे एक असे पाच आमदार शिरुर लोकसभा मतदार संघात असल्यामुळे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचे या मतदार संघात असलेले जाळे व नामदार वळसे पाटील यांची व्ह्यूवरचना तसेच उद्योगपती देवेंद्र शाह यांचे नियोजन आणि कार्यकर्त्यांमध्ये दुणावलेला उत्साह यामुळे आढळरावांचा स्थिती प्रचंड सकारात्मक असून ही निवडणूक आढळराव यांच्या दृष्टीने सुखकर दिसत असल्याचे वातावरण सध्या पहावयास मिळत आहे .
त्या तुलनेत विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्या बाबत विचार करता मतदार संघात शरद पवार गट व उद्धव ठाकरे यांच्या बद्दल प्रचंड सहानुभूती लाट आहे तरी शरद पवार व उद्धव ठाकरे गट यांच्या पक्षाकडे मतदार संघामध्ये सक्षम सेनापती नसल्याने त्यांच्या बाबत असलेल्या त्या साहनुभूतीचा फायदा कोल्हे यांना मिळविणे सद्यातरी कठीण दिसते. व त्यातच सक्षम कार्यकर्त्यांचे जाळे खासदार अमोल कोल्हे यांच्या कडे दिसून येत नाही. त्यामुळे अमोल कोल्हे यांच्याकडे शरद पवार गट व उद्धव ठाकरे गटाचे प्रामाणिक कार्यकर्ते असले तरी ते त्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्यात अपयशी ठरताना दिसत असून याचा फायदा माजी खासदार आढळराव यांना होताना दिसत आहे असे चित्र सध्या मतदार संघात पहावयास मिळत आहे.