राजकीय
सर्वांनी एकजुटीने काम करून शिरूरचा महायुतीचा शिलेदार संसदेत पाठवावा -देवेंद्र शाह
शिरुर लोकसभा मतदार संघाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांना विजयी करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने कामाला लागावे असे आवाहन शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्रशेठ शाह यांनी कार्यकर्त्यांना केले आहे
देशामध्ये लोकसभा निवडणुकीच्या पडघम वाजू लागले आहेत.लोकशाहीच्या देवतेचा हा उत्सव मोठ्या उत्साहात सुरू झाला असून देशाच्या विकासासाठी व देशाला जगातील महासत्ता करण्यासाठी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या भाजप प्रणित एन डी ए चे सरकार सर्वंकष प्रयत्न करीत आहे यासाठी महाराष्ट्रात महायुतीच्या सर्व उमेदवारांना मोठ्या फरकाने विजयी करणे ही प्रत्येक कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे.
शिरुर लोकसभा नतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी शेतकरी,कामगार, बेरोजगार युवक यासह जनसामान्यांच्या अडीअडचणी समजावून घेऊन त्या संसदेमध्ये मांडणारा मतदार संघाच्या विकासाचा ध्यास असलेला व सर्वसामान्य जनतेशी नाळ जुळलेला सक्षम व कर्तव्य दक्ष म्हणून नावलौकिक असलेले महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांना आपणाला प्रचंड बहुमताने विजयी करून संसदेत पाठववायचे आहे. महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करून जीवाचे रान करून शिरुर लोकसभेची विजयश्री खेचून आणावयाची आहे.
दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व देवेंद्र फडणवीस तसेच सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करून शिरूरचा शिलेदार संसदेत पाठवावा असे आवाहन शाह यांनी केले आहे
Sudhir kale
April 8, 2024 at 9:02 am
Its Very tuf fit. wish all the best
Both of you.