सामाजिक

पीडितांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी,संकटकाळी देवासारखा “दत्त” म्हणून मदतीला धावणारा जण सामान्यांचा नेता “देवदत्त”

Published

on

आजच्या काळात सर्वसामान्य जणांचे आसू पुसत संकटकाळी सर्वसामान्यांच्या मदतीला धावणारी निस्वार्थी मंडळी थोडीच असतात. सर्वसामान्यांच्या सुखदुःखात धावून जाऊन मदतीचा हात तर दूरच, पण आपुलकीचे चार शब्द बोलणेही आजच्या नेत्यांना जमत नाही. परंतु या काळातही सर्वसामान्यांना आपले म्हणणारी अनेक सामाजिक व राजकीय क्षेत्रांत अनेक मंडळी कार्यरत आहेत. त्यात एक नाव येते ते म्हणजे, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम 

घटना इतरांच्या दृष्टीने तशी साधीच पण घटना कोणतीही असो आनंदाचे सर्वच सोबती असतात पण दुःख प्रसंगी जे उभे राहतात तेच खरे मित्र, “म्हणतात ना….” बुडत्याला काडीचा आधार”, अशाच वेळी  पीडित कुटुंबावर कोसळलेल्या  दुःखात त्यांना आधार देऊन सावरण्यासाठी   देवासारखे दत्त म्हणून उभे ठाकले ते “देवदत्त”

याबाबत सविस्तर वृत्त असे समजते की,घोडेगाव पासून सुमारे  चार कि मीटर अंतरावर असलेल्या  बाभुळवाडी (साल)येथे राहत असलेल्या श्री.गुलाब देवराम कदम यांचा शेतातील बैलांचा गोठा जाळून खाक झाला यात दोन बैल यासह अनेक वस्तू जाळून खाक झाल्याची दुःखद घटना घडली

( आगच्या भक्ष्यस्थानी पडलेला गोठा)

बैल हा प्राणी शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एक सदस्यच असतो. आपल्याकडे असलेल्या पाळीव प्राण्यांना निटपणे वैरण पाणी दिले कि नाही. याची चौकशी केल्याशिवाय किंवा त्यांना खाऊ घातल्या शिवाय बळीराज्याच्या पोटात कधीच अन्नाचा घास जाणार नाही. अशातच आपले दोन बैल आगीच्या भक्ष्यस्थानी पडले म्हटल्यावर शेतकऱ्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला म्हणणे वावगे ठरणार नाही.  

(शेतकरी कुटुंबाचे सांत्वन करताना देवदत्त निकम)

याबाबत असे कळते की, दुपारच्या वेळी  अज्ञात व्यक्तिने गुलाब कदम यांच्या शेतातले बांधाचे गवत पेटवले . त्यावेळी हवा जास्त असल्यामुळे इतर शेतातील बांध पेटु लागले व दुपारी घरी कोणीही नसल्यामुळे जवळच असलेल्या गोठ्याला आग लागली यात श्री.गुलाब कदम यांच्या गोठ्यातील दोन बैल,शेतीची अवजारे ,धान्य,पाईप व ईतर आंब्याची झाडे हे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले यामुळे पीडित शेतकऱ्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला  .या घटनेची बातमी पुणे जिल्हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष देवदत्त निकम यांना मिळाल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या सुरू असलेल्या राजकीय धामधूमिकडे दुर्लक्ष करीत  देवदत्त  निकम यांनी साल गावात जाऊन संबंधित पीडित कुटुंबियांची भेट घेऊन विचारपूस केली.

 दरम्यान पीडित कुटुंबियांना शासकीय पातळी वरून तातडीची मदत मिळावी  यासाठी  घोडेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक.भालेकरसाहेब व तहसीलदार आंबेगाव यांच्यासोबत चर्चा करून पीडित कुटुंबियांना मदत मिळण्याविषयी विनंती केली. त्याचप्रमाणें  कदम कुटुंबियांना प्राथमिक स्वरूपात आर्थिक मदत व्हावी यासाठी रुपये पाच हजार मदत रोख स्वरूपात देऊन मदतीचा हात पुढे केला.

 या वेळी घोडेगाव शिवसेना (उद्धव ठाकरे) शहर प्रमुख नंदकुमार बोऱ्हाडे, जेष्ठ नेते बबन राव गव्हाणे ,सागर गव्हाणे,अतुल गव्हाणे,वसंत गव्हाणे,,शिवदास गव्हाणे,कचर गव्हाणे, ,मिनाबाई गव्हाणे ,गिरीश मते,विशाल वाबळे आदी मान्यवर घटना स्थळी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version