राजकीय
धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा एल्गार….. विखे बाजी मारणार, की लंके वरचढ ठरणार?
लोकसभेच्या रणसंग्रामात अहमदनगर दक्षिण मतदार संघात घराणेशाही,धनशक्ती विरोधात जनशक्ती असा एल्गार सुरू असून असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. या मतदार संघात महायुतीचे उमेदवार खासदार सुजय विखे यांचे विरोधात महा आघाडीचे उमेदवार आमदार निलेश लंके असा सामना होणार आहे.
विखे घराण्याचे समाज्याविषयी काम सर्वसृत आहे.लोणी प्रवरा परिसरात विखे पाटलांच्या घराण्यातील मागील पिढीने समाज्यासाठी केलेल्या कामांची पावती तो परिसर पाहिल्यावरच लक्षात येते. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या विविध संस्थांच्या माध्यमातून दिसते सहकारी क्षेत्राचे जनक म्हणून विखे घराण्याचा नावलौकिक आहे. खासदार सुजय विखे यांचे पणजोबा विठ्ठलराव विखे यांच्या पासून या घराण्याचे सहकार क्षेत्रात मोलाचे कार्य आहे.
या सर्व पाश्वभूमीवर हजारो कार्यकर्त्यांचा संच, आर्थिक दृष्टया सक्षम कार्यकर्ते प्रचंड फौजफाटा याचे नियोजन करणारी प्रशिक्षित माणसं आदी सर्व गोष्टी खासदार सुजय विखेच्या दृष्टीने सकारात्मक असून आणखी एक म्हणजे स्वताचे कर्तृत्व किती? यापेक्षा पूर्वजांनी समाज्यासाठी केलेले समाज सेवेचे कार्य सुजय विखे यांची सर्वातमोठी जमेची बाजू आहे.
तर दुसरीकडे महा विकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके एक सर्व सामान्यांचा जवळचा माणूस म्हणून ख्याती आहे निलेश लंके यांच्या मागे मागील पिढीचे कार्य दाखविण्यासारखे नसले तरी निलेश लंके यांच्या स्व कर्तृत्वाची भुरळ मात्र जनतेला पडल्याशिवाय रहात नाही.
सर्वसामान्यांसाठी अहोरात्र झटणारा कार्यकर्ता म्हणून निलेश लंके यांनी येथील जनतेच्या मनात स्थान मिळविले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे आमदार लंके यांचे करोना काळातील समाजसेवेचे व्रत उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे त्यांच्या कार्याची सर्वत्र दखलही घेतली गेली आहे.
लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजल्यानंतर सर्वच मतदार संघात राजकीय हवा देखील तापली आहे.सर्व उमेदवार आपल्या कार्यकर्त्यांसोबत गावोगावी, वाडीवस्तीवर जाऊन प्रचार करीत आहेत.यात अहमदनगर दक्षिण चे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या जनसंवाद यात्रांना नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.
जनसामन्यातील नेता म्हणून निलेश लंके यांची समाज्यात ओळख आहे परिस्थितीने कमकुवत असला तरी मनाने दिलदार व अडी अडचणीच्या वेळी मदतीला धावणारा दिलदार नेता म्हणून सर्वत्र निलेश लंके यांची ओळख आहे. आपल्या कर्तृत्व शैलीने जनतेला आकर्षित करण्याची त्यांची वृत्ती किरकोळ गोष्टीतून ही मतदारांची मने जिंकत असल्याचे दिसत आहे. अशीच एक घटना पहावयास मिळाली ती अशी की,
दक्षिण अहमदनगर मतदार संघात येणाऱ्या श्रीगोंदा तालुक्यात जनसंवाद यात्रेचे निमित्ताने मतदारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. यावेळी रात्री दोन वाजताच्या सुमारास लंके यांची जनसंवाद यात्रा "पारगाव सुद्रीक" या ठिकाणी पोहचली. यावेळी शेकडो तरुण कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते.
दरम्यान रात्री अडीच वाजताच्या सुमारास त्यांनी कार्यकर्त्यासोबत जेवण उरकल्यानंतर त्यांनी याच गावातील विठ्ठल रुख्मिनी मंदिरात आराम केला.यावेळीं कार्यकर्त्यांनी खूपच आपुलकीच्या हळव्या भावना व्यक्त झाल्या साधारणपणे इतर उमेदवार प्रचाराचे दरम्यान आपल्या सोबत असलेल्या सर्वसामान्य कार्यकार्याना इतरत्र ठेवून आराम करण्यासाठी एखादया जवळच्या उच्चब्रू कार्यकर्त्यांच्या घरी जातात. परंतु निलेश लंके यांनी असे न करता विठ्ठल रुख्मिनी मंदिरातच आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यासमवेत राहणे पसंत केले व या ठिकाणी हरिनामात तल्लीन होत आराम केला.
सकाळी ही वार्ता येथील नागरिकांना समजल्यानंतर येथील नागरिकांकडून निलेश लंके यांच्या बद्दल आदर व्यक्त करीत जास्तीत जास्त मताधिक्य देण्याबाबत सकारात्मकता दर्शवली.