सामाजिक

लग्नमंडपात नवदांपत्याने केला मतदान करण्याचा संकल्प …..

Published

on

मंचर (राजेंद्र चासकर यांजकडून)- आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील मंचर  (ता.आंबेगाव) येथे चि.सूरज व चि.सौ.का.तनुजाया नवदांपत्याने लग्न मंडपात मतदान संकल्प पत्र भरुन मतदानाचा संकल्प केला.अशी  माहिती आंबेगाव विधानसभा मतदार संघाच्या मतदार जनजागृती पथकाचे प्रमुख सुनील भेके यांनी दिली.

लोकसभा निवडणुकांचे पडघम सर्वत्र वाजत असून मतदारांना मतदान करण्यासाठी शासनाकडून विविध युक्ती प्रयुक्ती वापरली जात आहे यासाठी 36शिरुर लोकसभा मतदार संघ अंतर्गत 196 आंबेगाव विधानसभा मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी गोविंद शिंदे व तहसिलदार संजय नागटिळक, स्वीप नोडल अधिकारी सविता माळी , निवडणूक नायब तहसीलदार सचिन वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव विधानसभा मतदार संघात मतदार जनजागृती अभियान सुरु आहे.

येत्या 13 मे रोजी शिरूर लोकसभा मतदार संघात मतदान होत असुन मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणुन आंबेगाव स्वीप पथकाच्या वतीने विविध  उपक्रमांचे आयोजन आंबेगाव विधानसभा मतदार संघात कऱण्यात आले आहे. 

त्याअंतर्गत जीवन मंगल कार्यालय मंचर येथे श्री जगन्नाथ दगडू टेके राहणार वडगाव काशिंबेग  यांचे सुपुत्र चि. सुरज  व श्री. रोहिदास इंदोरे राहणार चांडोली खुर्द यांची कन्या चि.सौ का. तनुजा यांच्या शुभविवाह प्रसंगी नववधूवराने १३ मे रोजी लोकसभा निवडणुकीत मतदान करणार असल्याबाबत संकल्पपत्र भरुन मतदान करण्याचा संकल्प केला या वेळी उपस्थित सर्व वऱ्हाडी मंडळी यांना मतदार मार्गदर्शिका वाटप करुन त्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले आणि १३ मे रोजी लोकसभा निवडणुकीत शंभर टक्के मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. 

दरम्यान या वेळी मतदार जनजागृती पथकाचे सदस्य सचिन तोडकर, विनायक राऊत, काशिनाथ घोंगडे, तुषार शिंदे, अशोक लोखंडे, राहुल रहाटाडे, नारायण गोरे, सुरेश रोंगटे, अभिजित नाटे, मंगेश जावळे  उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version