राजकीय

अढळरावांनी, वळसे पाटलांची भेट घेऊन केली चौकशी

Published

on

माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या  तब्बेतीची विचारपूस केली.

काही दिवसांपूर्वी राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा एक छोटासा अपघात झाला होता. या अपघातात वळसे पाटील यांच्या पायाला व हाताला दुखापत झाली होती. त्यांनंतर वळसे पाटील यांना पुणे येथे उपचारासाठी ठेवण्यात आले होते. सुमारे पंधरा दिवसानंतर वळसे पाटील यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे .

दरम्यान काल दि २९ रोजी वळसे पाटील यांना घरी आणल्यानंतर विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली. शिरुर लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी दिलीप वळसे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली व तब्बेतीची विचारपूस केली याप्रसंगी माजी जिल्हापरिषद सदस्य अरुण गिरे, शिवाजी राजगुरू आदी मान्यवर उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version