सामाजिक
मंचर येथे “कुलदैवत भैरवनाथ महाराज” यात्रेनिमित्त, कुस्ती आखाडा व भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन.
मंचर (ता.आंबेगाव) येथिल कुलदैवत श्री भैरवनाथ महाराज यात्रे निमित्त धार्मिक, सामाजिक, कार्यक्रमासोबत भव्य बैलगाडा शर्यती व कुस्तीच्या जंगी आखाड्याचे आयोजन करण्यात आहे व यासाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत अशी माहिती यात्रा कमिटीचे कार्याध्यक्ष वसंतराव बाणखेले यांनी दिली
मंचरचे कुलदैवत श्री भैरवनाथ महाराज
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मंचर येथे कुलदैवत श्री भैरवनाथ महाराज यांच्या यात्रेची सुरुवात दि 1 मे पासून सुरू होत असून सकाळी श्रीच्या मूर्तीला अभिषेक करून तदनंतर मांडव डहाळे हारतुरे यांची मिरवणूक काढण्यात येईल श्री च्या मूर्तीला हारतुरे अर्पण केल्या नंतर यात्रेस सुरुवात होईल. यात सकाळी ११ वाजता शाहीर स्वप्नील गायकवाड व शाहीर बाळासाहेब बिरुटे यांचा कलगी तुरा कार्यक्रम होईल, संध्याकाळी शुभेच्या दारूची आतेश बाजी करण्यात येईल त्यानंतर श्री भैरवनाथ महाराजांच्या पालखीची मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.
यात्रेनिमित्त बैलगाड्यांच्या भव्य शर्यतीचे आयोजन करण्यात आले असून यात भव्य बक्षिसे देण्यात येणार आहेत यात अनुक्रमे प्रथम क्रमांकासाठी -१२१०००/- व फळी फोड गाड्यासाठी -२१०००/- द्वितीय क्रमांकासाठी – १०००००/-रोख तर फळी फोड गाड्यासाठी- १५०००/- तृतीय क्रमांकासाठी – ७५०००/- तर फळी फोड गाड्यासाठी – १००००/- त्याचप्रमाणे चतुर्थ क्रमांकासाठी – ५१०००/-व फळी फोड गाड्यासाठी- ५०००/- अशी रोख स्वरूपात बक्षिसे ठेवण्यात आली असून सातत्याने तीन वर्षे प्रथम क्रमांकांत येणाऱ्या गाड्यास शेती औजारांसह एक ट्रॅक्टर देण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे कुस्तीच्या जंगी आखाड्याचे आयोजन करण्यात आले असून यात पाच लाख रुपयांची भव्य बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.तसेच “जल्लोष लावण्यवतींचा” या सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे तरी सर्वांनी यात्रेमध्ये सहभागी होऊन यात्रेची शोभा वाढवावी असे आवाहन यात्रा कमिटी अध्यक्ष दत्तात्रय थोरात, व समस्त ग्रामस्थ मंचर,शेवाळवाडी,निघोटवाडी व यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे