सामाजिक
घोडेगाव न्यू इंग्लिश स्कूलचे तीन विद्यार्थी राज्यस्तरीय जूनियर न्यूटन टॅलेंट सर्च परीक्षेच्या गुणवत्ता यादीत
घोडेगाव दि.- येथील न्यू इंग्लिश स्कूल चे तीन विद्यार्थी पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय जूनियर न्यूटन टॅलेंट सर्च परीक्षेत गुणवत्ता यादीत झळकले असल्याची माहिती विद्यालयाचे अध्यक्ष बाळासाहेब काळे यांनी दिली
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात असलेल्या घोडेगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून दर्जेदार शिक्षण दिले जात असल्याचे अनेकवेळा निदर्शनास येते कारण वेळोवेळी विविध शौक्षणिक ,सामाजिक उपक्रमातून विद्यार्थ्याना शालेय शिक्षणासोबत व्यावहारिक ज्ञान येथून दिले जाते त्यामुळे या शाळेचे विद्यार्थी अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन करताना दिसून येते.
दरम्यान पुण्यातील ब्रिलियंट पब्लिकेशन मार्फत नुकतीच राज्यस्तरीय जूनियर न्यूटन टॅलेंट सर्च परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, घोडेगाव या विद्यालयातील एकूण तीन विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीमध्ये झळकले आहेत. यामध्ये इयत्ता सहावी मध्ये शिकणारा सत्यम मोहन वाघमारे हा विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत १५वा, इयत्ता चौथीची कु.दुर्वा बिपिन रासकर ही विद्यार्थिनी राज्यात २८ वी, तर इयत्ता सहावी मध्ये शिकणारी कुमारी गौरी सचिन घटे ही विद्यार्थिनी राज्य गुणवत्ता यादीमध्ये ७३ वी आली आहे. विद्यालयातील इयत्ता दुसरी ते नववी या वर्गातील एकूण ५२ विद्यार्थी या परीक्षेत प्रविष्ट झाले होते.
दरम्यान हि परीक्षा इंग्रजी, भाषा, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान या विषयांवर आधारित असते. या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची शालेय अभ्यासक्रमा बरोबरच सामान्य ज्ञानाची चाचपणी होते. या परीक्षेत सहभागी विद्यार्थ्यांचे राज्य, जिल्हा व केंद्र गुणवत्ता यादी अशी विद्यार्थ्यांच्या प्राप्त गुणांनुसार विभागणी करून विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, रोख रक्कम व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात येते. या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या विषय शिक्षकांनी मार्गदर्शन केले
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष श्री. तुकाराम काळे, उपाध्यक्ष श्री. शाम शेठ होनराव, कार्याध्यक्ष श्री. राजेश काळे, संस्थेचे सेक्रेटरी श्री. अक्षय काळे, विद्यालयाचे चेअरमन श्री बाळासाहेब काळे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, संचालक, सल्लागार तसेच विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती मेरीफ्लोरा डिसोझा,उपप्राचार्या श्रीमती रेखा आवारी, पर्यवेक्षिका सौ.वंदना वायकर, वर्गशिक्षिका सौ. दीपा उजागरे , श्री.सागर लोखंडे,सर्व विषय शिक्षक विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून कौतुक केले.