सामाजिक

आंबेगाव मध्ये ढाबा, हॉटेलवर बेकायदेशीर दारूची विक्री होतेय खुलेआम, “महिला व मुलांची सुरक्षीतता धोक्यात”?, तर गृहखाते मात्र सुस्त

Published

on

शिंगवे – (प्रतिनिधी) आंबेगाव तालुक्याचे पूर्व भागात  बार हॉटेलमध्ये परवाना नसताना देखील खुलेआम   देशी दारूची सर्रास विक्री केली जात असल्याने त्याचा वाईट परिणाम सर्वसामान्य मले, महिला व नागरिकांना भोगावा लागत असूनही उत्पादन शुल्क व गृह खाते बघ्याची भूमिका घेऊन, मूग गिळून गप्प बसले असल्याचे दिसत आहे. 

 

दरम्यान तालुक्यातील रांजणी,वळती,पारगाव,पोंदेवाडी, लाखणगाव, लोणी,धामणी सह पूर्व भागात उत्पादन शुल्कचे लायसन्स असलेल्या व नसलेल्या हॉटेलमधून खुलेआम देशी गावठी दारूची विक्री केली जात असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. यातील काही हॉटेल व्यावसायिकांवर राजकीय वरदहस्त असल्याने ते सर्व कायदे बासनात गुंढाळून  बेलगामपणे राजरोज  देशी दारूची विक्री करीत आहेत.त्यामुळे या भागातील सामाजिक सलोखा संपुष्टात येत आहे.  दारूच्या नशेत  गुंड, मवाली व रोडरोमियो मद्यपी यांच्यामुळे या परिसरातील शाळकरी मुलांमुलींना व  महीलांना ग्रामस्थांना अक्षम्य त्रास सोसावा लागत आहे.

    आंबेगाव तालुक्यात पूर्व भागात अनेक ठिकाणी रस्त्यावर व्यवसायाच्या निमिताने अनेक ढाबे, हॉटेल उघडली गेलेली आहेत परंतु या  हॉटेल व धब्यांमधून अन्न विक्री ऐवजी बेकायदेशीर ‘मदिरा’ विक्रीचा व्यवसाय सर्रास सुरू आहे. 

तालुक्यात  या ढाबा संस्कृतीच्या नावाखाली सुरू असलेल्या बेकायदेशीर दारू विक्रीवर कुणाचाही अंकुश नसल्याचे दिसते त्यामुळे “मद्यपी तूर्रर्र तर सर्वसामान्यांच्या जीवाला हुरहूर” अशीच स्थिती पहावयास मिळत आहे.

या परिसरातील नागरिकांनी अनेक तक्रारी  करूनही गृह खाते मात्र याबाबत दाखल घेत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे पोलीस खात्याच्या या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला जात आहे. ढाबा मालकांकडुन पोलीस कारवाई टाळण्यासाठी भरभक्कम वजनदार पेटी दिली जात असल्यामुळेच की काय? परिसरातील  परवानाधारक व बिगर परवाना धारक हॉटेल, तसेच ढाब्यांवरील अवैध  देशी दारू विक्रीवर कुठलीही कारवाई होताना दिसत नाही.या उलट त्यांना संरक्षण दिलं जात असल्याची चर्चा ही नागरिकांतून ऐकावयास मिळत आहे.  

तालुक्यात सुरू सलेल्या या अनाधिकृत व्यवसायावर कारवाईचा बडगा सक्षम पणे उचलून सर्वसामान्य नागरिकांना होत असलेल्या या प्रवृत्तीवर आळा घालावा अशी मागणी नागरिक करीत असून    संबंधित राज्य उत्पादन शुल्क  वरिष्ठ अधिकारी पोलीस खाते याकडे लक्ष देतील का? हे पाहणे महत्वाचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version