राजकीय

शिवाजीराव आढळराव पाटील यांचा विजय निश्चित – देवेंद्रशेठ शाह

Published

on

सर्वच कार्यकर्ते एकजुटीने काम करत असून गावोगावी वाडीवस्तीवर जाऊन जनतेशी संपर्क साधत आहेत  महायुती शासनाने केलेल्या विकास कामांची माहिती देऊन मतदारांचा विश्वास संपादन करत असल्यामुळे शिरुर लोकसभा मतदार संघात शिवाजीराव आढळराव यांचा विजय निश्चित आहे, असा आत्मविश्वास शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्रशेठ शाह यांनी व्यक्त केला.

केंद्र शासन व राज्यसरकारने मोठ्या प्रमाणावर लोकपयोगी उपक्रम राबवून सर्व सामान्य माणसास दिलासा दिला आहे. केंद्राच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत नमो शेतकरी महासन्मान योजना , महिलांना  एसटी प्रवास योजना, वृद्धांसाठी मोफत प्रवास योजना, सुकन्या समृद्धी,लेक माझी लाडकी योजना, वृद्धांसाठी पेंशन योजना या सारख्या अनेक महत्वपूर्ण योजना राबविण्यात आल्या आहेत.

राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली तालुक्यात सर्व कार्यकर्ते एकदिलाने एकजुटीने मोठ्या आत्मविश्वासाने सर्व मतदार संघात काम करीत आहेत. तालुक्यात मागील मागील उमेदवारापेक्षा अधिकचे मतदान यावेळी आढळराव यांना होईल. त्याच बरोबर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी गेल्या वीस वर्षांत मतदार संघातील सर्वसामान्य  व्यक्ति केंद्रस्थानी धरून अनेक महत्वाचे मतदार संघाच्या विकासाचे प्रकल्प राबविले आहेत त्याचाही फायदा मतदानातून दिसून येईल.

  आंबेगाव तालुक्यासमावेत समवेत जुन्नर, खेड, शिरुर, हडपसर, भोसरी, तालुक्यातील महायुतीचे कार्यकर्ते व आमदार तसेच पदाधिकारी हे सर्वच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी, शिरुर लोकसभेतून शिवाजीराव आढळराव यांना संसदेत पाठविण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा करीत आहेत. त्याच बरोबर राज्याचे  उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित दादा पवार, यासमवेत प्रफुल्ल पटेल, बाबा सिद्धीगी या सारख्या नेत्यांच्या प्रभावशाली सभा पार पडल्यामुळे कार्यकर्ते व मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण असून याचा फायदा नक्कीच महायुतीच्या उमेदवाराला होईल. 

 शिवाजीराव आढळराव पाटील हे मागील सर्व निवडणुकांमध्ये जे त्यांनी विजयासाठी लीड घेतले होते. त्यापेक्षाही जास्त मतांनी निश्चित विजयी होतील असा विश्वास व्यक्त  शाह यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version