राजकीय
संकटग्रस्त परिस्थितीत विजयश्री मिळविण्यासाठी, प्रयत्नाची पराकाष्ठा करणारा, वळसे पाटलांचा दमदार योद्धा “देवेंद्र”…
मंचर – (संजय कोकणे यांजकडून) – शिरुर लोकसभा मतदार संघात आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असतानाच राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा अपघाता झाला अशा स्थितीत आंबेगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची मूठ बांधून त्यांना विश्वासात घेऊन कार्यकर्त्यांमध्ये एकवाक्यता ठेवत, तालुक्यातून महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना जास्तीत जास्त मतदान मिळविण्यासाठी प्रचंड मेहनत , शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शेठ शाह यांनी घेतली असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही
शिरुर लोकसभा मतदार संघात मतदान झाले कोण विजयी होणार,यासाठी दावे प्रतिदावे केले जात आहेत. सर्वच कार्यकर्त्यांनी विजयाची पताका फडकविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्नांची पराकाष्टा केली आहे. दोन्हीही बाजूचे कार्यकर्ते विजयाचा आत्मविश्वास बोलून दाखवीत आहेत गेल्या महिनाभरात आरोप प्रत्यारोपाच्या अनेक फैरी झाडल्या जात होत्या. आपला उमेदवार विजयी करण्यासाठी सर्वच कार्यकर्ते जीव ओतून काम करीत होते.
संकटग्रस्त काळात काम करण्यासाठी नेत्याजवळ उत्कृष्ट मुत्सद्दी सेनापती असणे आवश्यक आहे या उत्कृष्ट योध्याची भूमिका देवेन्द्र शाह यांनी वळसे पाटलांच्या अनुपस्थितीत समर्थपणे सांभाळली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फूट पडून झालेल्या विभाजनानंतर कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली संभ्रमावस्था तसेच गेल्या वीस वर्षाच्या काळात शिवाजीराव आढळराव शिवसेनेत असताना यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांना करावा लागलेला संघर्ष…व त्यानंतर आढळराव यांनी राष्ट्रवादीत केलेली घरवापसी या अचानक घटनांमुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती.
दरम्यान अशा प्रतिकूल परिस्थितीत सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा झालेला अपघात हे सर्व आव्हानात्मक परिस्थितीतमध्ये कार्यकर्त्यांमध्ये आढळरावविषयी असलेली नाराजी, दूर करून, कार्यकर्त्यांची मने जुळवित, कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण करून निवडणूक जिंकण्यासाठी जोश निर्माण करण्याचे काम देवेंद्र शाह यांना करावे लागले.
नामदार वळसे पाटील रुग्णालयात असल्यामुळे वळसे पाटलांशी सातत्याने संपर्क ठेवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांना एकत्रित करून व्यवस्थित व्युव रचना केली.आढळराव पाटील यांना आंबेगाव तालुक्यातून आघाडी मिळवून देण्याचे दृष्टीने अथक परिश्रम शाह यांनी घेतले. ज्या प्रमाणे इंद्रियांवर अंकुश ठेवत देवत्वाची परिणीती साधणारा तो देवेंद्र, त्याच प्रकारे सर्व कार्यकर्त्यांमध्ये विश्वासाची ज्योत निर्माण करीत आढळरावांचा विजयाचा मार्ग सुखर करण्यासाठी अपरिमित काम शहा यांनी केले.म्हणूनच असे म्हणावे लागेल कि संकटकाळी लढणारा वळसे पाटलांचा दमदार योद्धा म्हणजे देवेंद्र…