सामाजिक
“देवेंद्रांच्या” साक्षीने अनेक संतश्रेष्ठ,वरीष्ठ, मान्यवराकडून “अक्षाली व साकेत” या वधू वरांना मिळाले भरभरून शुभाशीर्वाद….
विवाह पूर्व मंगल मिलन सोहळ्याचे निमित्ताने वधुपिता “देवेंद्र” यांच्या साक्षीने, अनेक संतश्रेष्ठ,महंत जेष्ठगण,नातेवाईक व हितचिंतकांनी हजारोंच्या संख्येने, उपस्थित राहून सौ.कां अक्षाली व साकेत या वधूवरांना पुढील सुखमय आयुष्यासाठी भरभरून शुभाशीर्वाद दिले.
पुण्यभूमी मंचर (ता आंबेगाव) येथील शाह परिवारातील “देवेंद्र” यांनी, आपले बंधू “प्रीतम शाह” यांच्या सोबतीने उद्योग व्यवसायात जगभर नाव लौकिक वाढविला आहे,तसेच त्यांनी सर्वसामान्य जनमानसाच्या हृदयात आपल्या परोपकारी वृत्तीने, मानाचे व आपुलकीचे दृढ स्थान निर्माण केले आहे. समाज्यातील अनेक नव उद्योजकांचे मार्गदर्शक ठरलेल्या व सामाजिक कार्याचा वसा घेतलेले प्रसिद्ध उद्योगपती देवेंद्रशेठ शाह यांची सुकन्या सौ. कां “अक्षाली” हिचा विवाह गुप्ता परिवारातील वर, “साकेत” यांच्याशी होणार असून या विवाह सोहळ्या अगोदर या नवं दांपत्यांना, संत श्रेष्ठ , वडीलधारे, आप्तेष्ठ यांचे शुभाशीर्वाद लाभावेत या निमित्ताने विवाह पूर्व मंगलमय मिलन सोहळ्याचे शानदार आयोजन करण्यात आले होते. यात हजारोच्या संख्येने हितचिंतकांनी उपस्थित दर्शविली
“विवाह सोहळा” म्हणजे सोळा संस्कारात एक महत्वाचा गोड संस्कार होय. यात शिव शक्ती स्वरूप दोन जीवांच्या माध्यमातून, दोन कुटुंबे कायमस्वरूपी एकमेकांशी एका मंगलमय धाग्यात बांधली जातात. या संस्कारात अनेक देवी, देवता, अग्नी, पुरोहित, संत श्रेष्ठ, कुटुंबातील वरिष्ठ यांच्या साक्षीने वधू वर अग्निभोवती सप्तपदी घेतात व एकमेकांशी आयुष्यभर एकत्र व एकनिष्ठ राहण्याचे दृढ वचन देतात.म्हणून भारत वर्षात सक्षम व सुदृढ समाज बांधणीसाठी ,सनातन धर्मातील सोळा संस्कारांपैकी महत्वाचा व ब्रह्मांडाच्या पुनर्निर्माणाचा महत्वाचा संस्कार म्हटला जातो.
या प्रसंगी राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे (पाटील), माजी खासदार शिवाजीराव अढळराव(पाटील),सौ. किरणताई वळसे(पाटील), आमदार दिलीप मोहिते (पाटील),आमदार अतुल बेनके, , माजी आमदार शरद सोनवणे, युवा नेत्या पूर्वाताई दिलीप वळसे(पाटील),माजी जि प सदस्या आशाताई बुचके, कुलस्वामी पतसंस्थेचे अध्यक्ष शंकरशेठ पिंगळे, माजी सभापती कैलासबुवा काळे, भीमाशंकर सहकारी साखर कारखाना अध्यक्ष बाळासाहेब बेंडे , भाजपा जिल्हा सरचिटणीस संजय थोरात,शरद सहकारी बँकेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, कुलस्वामी पतसंस्थेचे संचालक भास्करराव डोके ,निरगुडसर गावचे सरपंच रवींद्र जनार्दन वळसे, सामाजिक कार्यकर्ते निळकंठ काळे, कपालेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामदासशेठ घोलप माजी सभापती संजय गवारी, बाबाजीशेठ टेमगिरे, प्रकाशराव घोलप,जितेंद्र बांगर,संजय सणस उत्तर पुणे जिल्यातील अनेक संतजन कला क्रीडा शौक्षणिक सामाजिक राजकीय धार्मिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवर व जनतेचा पोशिंदा समजला जाणारा बळीराजा(शेतकरी) यांच्यासह प्रतिष्ठित व्यापारी,पत्रकार, बांधवांनी उपस्थित राहून नवं दांपत्यांना शुभाशीर्वाद दिले. यात महिलावर्गाची उपस्थिती लक्षणीय होती