राजकीय
नाराज झालेला “एकनिष्ठ कार्यकर्ता” पुन्हा मिळविण्याचे, “भाजपा” पुढे मोठे आव्हान
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निवडणुकीमध्ये महायुतीने सपाटून पराभव झाल्यानंतर राज्यात राजकीय गणिते मोठ्या प्रमाणावर बदलू लागली आहेत. त्यामुळे सत्तेत असणाऱ्या महायुती सरकारला त्याचा चांगलाच फटका बसण्याची चिन्हे दिसत आहेत.
देशामध्ये भाजपा प्रणित एन डी ए सरकार सत्तेवर बसले. असून देशातील नव्हेतर महाराष्ट्रातील सर्वच नेत्यांनी मोदी तिसऱयांवेळी पुन्हा पंतप्रधान झाले असल्याचा फटाके फोडून, पेढे वाटून, आनंद व्यक्त करीत आहेत. परंतु , या वेळी पंतप्रधान मोदी यांनी डोक्यात घातलेला पंतप्रधान पदाचा सुवर्ण मुकुट मात्र आतून काटेरी मुकुट असल्याचे दिसत आहे.
“अच्छे दिन” चे वायदे करून पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१४ साली व त्यानंतर २०१९ सत्तेत आले तेंव्हा त्यांना म्हणजेच फक्त भाजपा जवळ पूर्ण बहुमत होते त्यामुळे एन डी ए तील घटक पक्षांनी काहीही भूमिका घेतली. तरी त्याचा काहीही फरक केंद्रातील सरकारवर पडू शकत नव्हता परंतु आता परिस्थिती मात्र खूपच वेगळी आहे. आता पंतप्रधान मोदींना एन डी ए तील घटक पक्षांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय लादता येणार नाही त्यामुळे पुढील काळात या घटक पक्षांच्या गरजा पुरविताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नाकेनऊ येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान महाराष्ट मात्र महायुतीच्या हातातून दिवसेंदिवस निसटू लागला आहे.याचे महत्वाचे कारण म्हणजे भाजपा नेते व महायुतीचे शिल्पकार देवेंद्र फडणविस यांनी महाराष्ट्रात सत्तेच्याआ लालासेपायी म्हणा किंवा सूड बुद्धीने प्रेरित होऊन म्हणा, जी फडणवीस नीती वापरली व इतर पक्षांमध्ये फोडाफोड केली. हीच पक्ष फोडाफोड महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडली असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
महाराष्ट्रात आघाडी शासन सत्तेत असताना आघाडी शासनातील गोंधळ व त्यांच्यावर होत असलेल्या आरोपामुळे त्या काळात आघाडी शासनाची गणिमा खराब होऊ लागली होती.परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासन पडल्यानंतर शिंदे गटा सोबत व त्यानंतर गरज नसतानाही अजित पवार यांच्यासोबत संसार थाटला ही एक मोठी चूकच होती त्या ऐवजी सरळ पुन्हा निवडणुकीला सामोरे जायचे ठरविले असते तर भाजपाला महाराष्ट्र्रात प्रचंड यश मिळाले असते यात शंका नसल्याचे अनेकांचे मत आहे.
.
राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांची गणिमा खराब करण्याचा प्रयत्नच त्यांच्या अंगाशी आला कारण फडणवीसांच्या पक्षाचे काही प्रवक्ते ज्याप्रमाणे आरोप करण्याच्या नादात पातळी सोडून बोलत होते ते महाराष्ट्रातील जनतेला मान्य झाले नाही तसेच ज्या नेत्यांना भाजपाने गैरव्यवहारायच्या आरोपाखाली जेल मध्ये टाकन्याची भाषा केली त्याच नेत्यांना भाजपाने मांडीवर घेतल्याने भाजपाची गणिमा सर्वसामान्य माणसात मालिन झाली.
दरम्यान त्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे या फोडा फोडीच्या राजकारणात भाजपाने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस च्या नेत्यांना आपणासोबत घेतले त्यामुळे या नेत्यांविरोधात वर्षानुवर्षे संघर्ष करणारा भजपाचा एकनिष्ठ कार्यकर्ता भाजपा पासून मोठ्या प्रमाणावर दुरावला आहे. त्यामुळे भाजपाचा पारंपारिक कार्यकर्ता नाराज असल्याचे दिसत आहे. त्यामुळे मागील पाच वर्षात भाजपाने सत्तेसाठी केलेल्या अनैसर्गिक युतीचा भाजपाला मोठा फटका पुढील काळातही बसू शकतो त्यामुळे पुढील येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे अगोदर भाजपाला हा दुरावलेला एकनिष्ठ कार्यकर्ता पुन्हा मिळविण्याचे मोठे आव्हान असणार आहे. यात महाराष्ट्र भाजपा किती यशस्वी होते हे पाहावे लागणार आहे.