राजकीय

अजित पवार यांच्या विरोधात पुतण्या युगेंद्र पवार यांना उमेदवारी द्या, बारामतीकारांची शरद पवारांकडे एकमुखी मागणी

Published

on

पुणे- (ज्ञानेश्वर नेहे पाटील यांजकडून )- बारामती लोकसभेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा दारुण पराभव झाल्यानंतर , येथील नागरिकांनी “आम्हाला दादा बदलायचा आहे” आता युगेंद्र पवार यांना बारामती विधान सभेसाठी  उमेदवारी देण्याची मागणी केल्याने राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार   यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून थोरल्या पवार साहेबांचा विश्वासघात केल्याची भावना बारामतीकरांच्या जिव्हारी लागली असून, “मुलाने बापाचा हात धरून मोठे व्हायचे” व नंतर “बापालाच घराबाहेर काढायचे”, ही संस्कृती बारामतीकरांच्या मनात तीव्र संताप निर्माण करणारी असल्याची चर्चा या मतदार संघात आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सर्व काही देऊनही, अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पाडाली व भा. ज. पा. सोबत हात मिळवणी केली व  आपले काका म्हणजेच देशाचे माजी कृषिमंत्री शरदचंद्र पवार यांच्यावर नको त्या पद्धतीने खालच्या पातळीवर जाऊन आरोप केले. मोठ्या प्रमाणावर टीकाही केली. परंतु  मोठ्या पवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रती उत्तर दिले  नाही. हा कौटुंबिक वाद वाढत असताना , त्यात भा ज पा चे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एक वादग्रस्त विधान केले की, आम्हाला फक्त शरदचंद्र पवार यांना हरवायचे आहे. म्हणुन बारामती मधुन अजित पवार यांच्या पत्नीस उमेदवारी दिली आहे. त्यामुळे बारामतीचे मतदारांचा अधिकच तीव्र संताप झाला.

बारामती च्या मतदारांनी शरद पवार यांना शह देण्यासाठी,  आलेल्या भाजपा ला जागा दाखविण्यासाठी मतदारांनी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती  लोकसभा मतदारसंघात आपली बहिण सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली पत्नी सुनेत्रा पवार यांना उभे केले. परंतु यात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव करत बारामती लोकसभेतील जनतेने शरद पवारांना साथ दिली.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेले कृत्य बारामतीकर जनतेला रुचलेले नाही त्यामुळे नुकत्याच झालेल्या बारामती येथे पक्ष कार्यालयात अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांचा जनता दरबार सुरू असताना, यावेळी अचानकपणे  या जनता दरबार साठी दस्तुरखुद्द शरदचंद्र पवार उपस्थित राहिले. यावेळीं पवार साहेबांसमोर उपस्थित कार्यकर्त्यांनी, “आम्हाला “दादा” बदलायचा आहे. असे म्हणत,  योगेंद्र पवार यांना बारामती विधान सभेतून उपमुख्यमंत्री अजित पवार विरोधात उमेदवारी द्या अशी एकमुखी मागणी शरदचंद्र पवार यांच्या कडे केली आहे.

दरम्यान शरद पवार यांनी कार्यकर्त्यांची मागणी मान्य केली. तर अजित पवार यांना ही निवडणूक अतिशय जड जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे मागील लोकसभेत मावळ मतदार संघातून पार्थ पवार यांचा पराभव यानंतर बारामती मधून पत्नी सुनेत्रा यांचा पराभव तर या वेळी विधानसभेत अजित पवार यांना हि   पराभव पत्करावा लागेल अशी चर्चा सध्या सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version