गावागावातुन
“मंचर” नगरपंचायतीने नव्याने लादलेली जाचक कर आकारणी रद्द करावी – संजय थोरात
मंचर दि- (प्रतिनिधी) नगरपंचायत (ता.आंबेगाव) कडून नव्याने नेमण्यात येणारी कर आकारणी दरातील वाढ रद्द करावी अशी मागणी जनसेवक श्री संजय जिजाबा थोरात यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लेखी पत्र करण्यात आले आहे.
आंबेगाव तालुक्यातील नव्याने स्थापन झालेल्या मंचर नगरपंचायतीने नागरिकांना नोटीस पाठवून नवीन कर आकारणी करण्यात येणार आहे. असे त्या नोटिसामध्ये उल्लेख केला आहे.घराचे मोजमाप स्क्वेअर फुट टाकून नवीन कर त्यामध्ये नमूद केले आहे या अन्यायकारक कर वाढी संदर्भात भाजप नेते जनसेवक श्री संजय जिजाबा थोरात यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब,अजित दादा पवार साहेब, शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील,सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील साहेब,माजी खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील अशा लोकप्रतिनिधींना पत्र व्यवहार करून अन्यायकारक कर आकारणी रद्द करण्यात यावी अशी विनंती केली आहे.
दरम्यान भाजप नेते संजय थोरात यांनी पाठविलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे की,माझ्या आंबेगाव तालुक्यातील मंचर नगरपंचायत कडून सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात अन्यायकारकरीत्या कर वाढ करण्यात येणार आहे तशा नोटीसा नागरिकांना पाठवण्यात आलेल्या आहे संबंधित कर आकरणीबाबत नागरिकांच्या आलेल्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी, स्थानीय अपील समिती अस्तित्वात नसल्याने अशाप्रकारे नवीन कर वाढ करणे अत्यंत चुकीचे असून पूर्वीच्या करा पेक्षा अवाढव्य कर आकारणी करण्यात येणार आहे. तसेच वृक्ष कर,शिक्षण कर, अग्निशमक कर व स्वच्छता कर हे ही कर अवाच्या सव्वा पद्धतीने वाढ करण्यात येणार आहे. असे नोटीस मध्ये नमूद आहे या अन्यायकारक कर वाढी वर सर्व नागरिकांनी विरोध दर्शविला असून मोठ्या प्रमाणात हरकती प्राप्त झालेल्या आहेत.