राजकीय

“मंचर” नगरपंचायतीने, लागू केलेला मिळकतीवरील जाचक कर लवकरच कमी होणार -शिवसेना (उ.बा.ठाकरे)तालुका प्रमुख दत्ता गांजाळे

Published

on

मंचर” नगरपंचायतीने, लागू केलेली जाचक करप्रणाली लवकरच मागे घेऊन मंचर वासीयांना सुयोग्य करप्रणाली नगरपंचायतीकडून लवकरच दिली जाणार असल्याची माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आंबेगाव तालुका प्रमुख दत्ता गांजाळे यांनी दिली.

पुणे – नाशिक महामार्गावर असलेल्या “हॉटेल दिधारा” या ठिकाणी शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे) आंबेगाव तालुक्याचे वतीने आयोजित केलेल्या  पत्रकार परिषदेत तालुका प्रमुख दत्ता गांजाळे यांनी मंचरनगर पंचायतीच्या जाचक करप्रणाली विषयी माहिती देताना सांगितले की, मंचर ग्रामपंचायतीचे विलीनीकरण नगरपंचायतीमध्ये झाल्यानंतर, मंचर नगरपंचायत प्रशासनाने सुधारित करप्रणाली लागू केली. ही लागू केलेली कर प्राणालीमध्ये अनेकप्रकारचे जाचक कर लावण्यात आले आहेत. शासन निर्देशानुसार जरी कर लावणे अपेक्षित असले तरी, हे लावण्यात आलेले कर  खूपच मोठ्या प्रमाणावर लावण्यात आल्यामुळे ते सर्वसामान्य मंचरवासीयांच्या आवाक्याबाहेर आहेत. नागरिकांतून मंचर नगरपंचायतीने लावलेल्या कर प्रणाली विषयी प्रचंड असंतोष आहे.या बाबत अनेक नागरिकांनी लेखी स्वरूपात करप्रणालीविषयी पुनर्विचार होण्याबाबत नगरपंचायतीला कळविले आहे. 

दरम्यान सर्व सामान्य मंचर कारांच्या भावना लक्षात घेऊन आंबेगाव तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे वतीने संबंधित अधिकारी समवेत वेळोवेळी चर्चा करण्यातआल्या होत्या यातून मंचरकरांना परवडणारी योग्य अशी करप्रणाली तयार करून लागू करण्यात विषयी प्रशासकीय पातळीवर सहमती दर्शविण्यात आली असून पुढील काळात लवकरच संबंधित प्रशासकिय अधिकारी या बाबत योग्य निर्णय घेऊन नवीन माफक करप्रणाली जाहिर करतील असेही गांजाळे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की हा काही राजकारणाचा भाग नाही तर सर्वसामान्य मंचर कारांना होणारा त्रास दूर करण्यासाठी तालुक्यातील इतरही संघटनांनी यात सहभाग घेणे अपेक्षित आहे राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनीही यात लक्ष घालून मंचरकर वासीयांना न्याय मिळेल या साठी प्रयत्न करावेत असे आवाहन गांजाळे यांनी केले.

या वेळी शिवसेना उबाटा जिल्हा संघटक राजाराम बाणखेले, मंचर शहर प्रमुख विकास जाधव, महेश घोडके आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version