गावागावातुन
डिंभे धरणातील पाणी साठा संपुष्टात, मान्सून सक्रिय होण्यास उशीर झाल्याने अनेक ठिकाणी पाणी संकट निर्माण होण्याची शक्यता

मंचर (प्रतिनिधी) -डिंभे येथील हुतात्मा बाबू गेणू जलाशय (डिंभे धरणात)सध्या 0.75% पाणीसाठा उपलब्ध असून, धरणातील पाणीसाठा पातळी मृत साठ्या पेक्षा कमी झाली आहे व मान्सूनचे आगमन अद्यापही न झाल्याने अनेक गावांना शेतीसह पिण्याच्या पाण्याच्या पाण्याचे संकट निर्माण होऊ लागले आहे.
पुणे-नगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या येथील शेतकऱयांच्या अर्थकारणाचे मूळ स्रोत असलेल्या डिंभे धरणाच्या पाण्याच्या पातळी मध्ये या वर्षी भयानक घट झाली आहे. या पाण्यावरच पुणे व नगर जिल्यातील शेतकऱ्यांचे शेकडो एकर शेती क्षेत्र क्षेत्र अवलंबून असते. त्याचप्रमाणे औद्योगीकरनात सुद्धा मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याचे हे महत्वाचे स्त्रोत आहे.त्याचप्रमाणे शेकडो गावाच्या पिण्याच्या पाण्याच्या नळपाणी पुरवठा योजना घोडनदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे पुणे व नगर जिल्ह्यातील शेकडो एकर शेतीसाठी तसेच हजारो कुटुंबांची ” घोडनदी” ही जीवनदायिनी आहे. याच नदीवर असलेले आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरणातील पाण्याची पातळी सुद्धा सध्या प्रचंड प्रमाणावर खालावली आहे.त्यामुळे अनेक गावांवर पाणी संकट निर्माण झाले आहे.व मान्सून सक्रिय होण्यास उशीर झाल्याने अनेक ठिकाणी पाणी संकट निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या कालावधीमध्ये प्रशासन यंत्रणा धाब्यावर बसवत राजकीय पुढारयांनी आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी पाण्याचे नियोजन न करता गरज नसताना उजव्या व डाव्या कालव्यासहित नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडून दिले. सुमारे तब्बल चार महिन्यापर्यंतच्या कालावधीत पाणी नदीपात्र व दोन्ही कालव्यात सोडण्यात आले. त्यामुळे आज डिंभे धरणाचे पाणी पातळी आज मृतसाठा पर्यंत पोहचली आहे.
दरम्यान जून पाहिना संपुष्टात आला तरीही पावसाळा सुरू झाला नाही. पाऊस पडत नसल्यामुळे गंभीर परिस्थितीत निर्माण झाली आहे.तर त्यामुळे पाटाला पाणी सोडणे शक्य नसल्याने अनेक गावं पाण्यापासून तहानलेली आहेत. अनेक गावाच्या पाणी पुरवठा योजनांवरही याचा परिणाम हाऊ लागला आहे नळ पाणीपुरवठा सुद्धा बंद पडल्याची शक्यता नाकारता येत नाही. सद्या जून महिना संपत आला आहे.
परंतु खेड जुन्नर आंबेगाव तालुक्यात अद्यापही मान्सून सुरू झाला नाही त्यामुळे सध्या आदिवासी गावणाच पाणी प्रश्न भेडसावत आहे .तर वेधशाळेने सांगितल्या प्रमाणे 1 जूनपासून मुसळधार पाऊस पडणार असा दिलेला अंदाज ही फोल ठरत आहे त्यामुळे पाऊस केंव्हा पडेल हे कदाचित सांगणे कठीन आहे. मात्र निवडणुकीच्या काळात बे मालूम पणे पाणी सोडण्याचा निर्णय येत्या काळात जनतेच्यायाया अंगलट येऊ नये त्यामुळे मान्सून लवकरात लवकर सुरू झाला तर भविष्यात निर्माण होणारे पाणी संकट दूर होईल.