सामाजिक
शिवसेना सहसंपर्क प्रमुख,व “साप्ताहिक बोभाटाचे” संपादक, अविनाश राहणे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
मंचर दि .(प्रतिनिधी)-संपूर्ण पुणे जिल्ह्यात शिवसेनेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी अहोरात्र झटणारा माणसातील देवमाणूस म्हणूनच अविनाश राहणे याची ओळख सर्वश्रुत होती यांच्या जयंती निमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
आज अविनाश राहणे अनंतात विलीन होऊन सुमारे दहा महिने झाले परंतु राहणे साहेबांच्या आठवणीतून आजही त्यांचा कार्यकर्ता अद्यापही सावरलेला दिसत नाही. उत्तर पुणे जिल्यामध्ये आजही शिवसेनेत निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यात शिवसेना नेते यशस्वी ठरलेले नाहीत. अविनाश राहणे यांनी जोडलेले शेकडो कार्यकर्ते आजही शांत आहेत. या कार्यकर्त्यांना कार्यरत करण्यात आजचे सेनाचे जिल्हा नेतृत्व कमी पडलेले दिसत आहे.
दरम्यान आज राहणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त खेड जुन्नर आंबेगाव तालुक्यात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमाचे कार्याकर्त्यांनी आयोजन केले गावागावांमध्ये वृक्षारोपण त्याच प्रमाणे हॉस्पिटलमध्ये, फळे वाटप, धार्मिक ठिकाणी जप पूजा , विविध ठिकाणी अन्नदान आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन कार्यकर्त्यांनी केले आहे. मंचर नगरपंचायत सभागृहात अविनाश राहणे यांना शिवसैनिकांनी श्रद्धांजली अर्पण केली.त्यानंतर येथून जवळच असलेल्या अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाचे जवळच टेकडीवर वृक्षारोपण करण्यात आले.त्याच प्रमाणे मंचर मतिमंद मुलाची शाळा येथे अन्नदान करण्यांत आले.
यावेळी श्रीमती माधवीताई राहणे, गांधार राहणे, राजाराम बाणखेले, बाळशीराम वाळुंज, कल्पेश आप्पा बानखेले, महेश घोडके, रंगनाथ थोरात, दिलीप नाना चव्हाण अनिल निघोट, सौ सुरेखाताई निघोट, सौ सुवर्णाताई डोंगरे अजित मोरडे विकास जाधव संतोष डोके आदी मान्यवर उपस्थित होते.
Sudhir kale
July 2, 2024 at 3:49 pm
Good