राजकीय
आंबेगाव तालुका राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे वतीने जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम यांच्या नेतृत्वाखाली, “मंचर” नगरपंचायतीच्या करवाढी विरोधात आंदोलन
मंचर दि. (प्रतिनिधी) नगरपंचायतीकडून करण्यात आलेली अवाजवी करवाढ रद्द करावी या मागणी साठी भीमाशंकर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम यांच्या नेतृत्वाखाली आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे वतीने नागरपंचायत कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले .
मंचर ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर पंचयातीमध्ये झाल्यानंतर नगर पंचायतीने मंचर ग्रामस्थांवर लादलेल्या करवाढीचा बोजा हा अवाजवी असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये असून ही अधिकची करवाढ तातडीने कमी करावी या साठी शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतिने आंदोलन करण्यात आले यावेळी जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब बाणखेले यांचे मार्गदर्शनाखाली मंचर शहराध्यक्ष कुणालआप्पा बाणखेले, लोकनेते किसनराव बाणखेले विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक गणेश खानदेशे, सुरेश निघोट, प्रतीक थोरात भक्ते, संजय काळे, जिल्हा युवक कार्याध्यक्ष गणेश यादव, तालुका अध्यक्ष धोंडीभाऊ भोर, महिला अध्यक्षा पूजा वळसे, किशोर थोरात, अमोल शेलार, स्वप्निल बांगर,आदी मान्यवरांसह मंचर शहरातील नागरिक उपस्थित होते.
मंचर नगरपंचायतला आठ दिवसांपूर्वी ग्रामस्थांच्या वतीने करवाढ रद्द करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले होते परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने आज आंदोलन करण्यात आले.नगरपंचायत प्रशासनाने केलेली करवाढ हि मोठ्या प्रमाणात आहे.स्थावर मालमत्ता घरे,ओपन स्पेस, शेतमालसाठी असलेले शेड,बखळ जागा,दुध उत्पादक व इतर शेतकरी यांनी जनावरांसाठी उभारलेला गोठा याच्यावर एकदम मोठ्या प्रमाणात कर आकारणी केल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.त्यामुळे प्रशासनाला रोषाला सामोरे जावे लागत आहे.
दरम्यान शहरातील सुरू असलेली विकास कामे अतिशय निकृष्ट दर्जाची आहेत व यावर योग्य रीतीने नियंत्रण ठेवावे अन्यथा त्या ठेकेदार यांना ब्लॅक लिस्ट मध्ये टाकावे.या सर्व विषयांवर साधकबाधक चर्चा होऊन दिड महिन्याच्या आत सर्व प्रश्न सोडविले जातील असे आश्वासन मंचर नगरपंचायतचे मुख्याधिकारी गोविंद जाधव साहेब यांनी दिले आहे.यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण फुगे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.