सामाजिक

पुणे जिल्ह्यात रात्री फिरत असणाऱ्या “ड्रोन”चा बंदोबस्त करणार- पोलिस अधिक्षक पंकज देशमुख

Published

on

पुणे दि.(प्रतिनिधी) जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रात्रीच्या सुमारास ड्रोन घिरट्या घालत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तसेच जिल्ह्यात सर्वत्र वेगवेगळ्या चर्चा सुरू असल्याने ड्रोन बाबत नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे, चोरट्यांच्या टोळ्यांकडून चोरी करण्यासाठी या ड्रोनचा वापर केला जात असल्याच्या अफवा देखील ग्रामीण भागात रंगत आहेत. यावर पुणे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी या ड्रोनबाबत पोलिस प्रशासन कार्यवाही करणार असल्याचे सांगितले आहे.

https://bobhatanews.in/wp-content/uploads/2024/07/VID-20240703-WA0014-5.mp4

पुणे जिल्ह्यात रात्रीच्य वेळी विविध ठिकाणी हे ड्रोन निदर्शनास आले असून, हे ड्रोन कोठून येतात आणि कुठे गायब होतात, हे समजत नसल्याने पुणे जिल्ह्यात नागरीकांमध्ये सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांना याबाबत नागरिकांनी सूचना दिल्यावर पोलिस गावा गावात जाऊन गस्त घालत आहेत. परंतु, ड्रोनचा कोणताही शोध लागत नसल्याने हे रात्री उडणारे ड्रोन नागरिकांची आणि पोलिसांची डोकेदुखी बनली आहे. हे ड्रोन नेमका कोण व कशासाठी उडवत आहे, याच्या साहाय्याने हेरगिरी करून परिसरात चोऱ्या तर होत नाही ना, असे प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित होऊ लागले आहेत. रात्री फिरणाऱ्या ड्रोनचा शोध घ्यावा, अशी मागणी आता ग्रामीण भागातील नागरिक करत आहे. त्यावर पोलिस प्रशासन हे रात्री दिसणारे ड्रोन पाडण्यासाठी यंत्रणा उभी करणार असल्याचे पोलिस अधिक्षक देशमुख यांनी सांगितले आहे . परंतु नक्की हे ड्रोन कोणासाठी काम करत आहेत. या बाबत ठोस माहिती नाही त्यामुळे यांचा शोध सरकार घेणार का? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version