शैक्षणिक
शिष्यवृत्ती परीक्षेत न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, घोडेगावची स्नेहल व ओम राज्य गुणवत्ता यादीत
घोडेगाव दि – येथील आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचलित न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, घोडेगाव येथील कु. स्नेहल दत्तात्रय डुकरे या विद्यार्थिनीने शिष्यवृत्ती परीक्षेच्या राज्य गुणवत्ता यादीत २२ वे तर कु. ओम रवींद्र मेहेर या विद्यार्थ्याने राज्य गुणवत्ता यादीत २६ वे स्थान प्राप्त केले आहे.
नुकत्याच जाहीर झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेची गुणवत्ता यादीत राज्य व जिल्हा गुणवत्ता यादी इंग्लिश मीडियम स्कूलच्या एकूण १४ विद्यार्थ्यांनी राज्य तथा जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे.तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता आठवी मध्ये एकूण ९ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये झळकले आहेत.
त्यामध्ये कु.रिया योगेश वाघमारे(J-100), कु. रुची रावसाहेब लोहोट(J-161), कु. श्रेयस संजय बोनावटे(J-269), कु.ओजस शांताराम पाटील(J-289), कु. पूर्वी संजय शिंदे(J-308), कु. शाफीन समीर मुजावर(J-313), कु. ऋतिका दीपक घोडेकर(J-340), कु. श्रद्धा राजेंद्र लोहोट(J-342), कु. सेजल राजेश खिंवंसरा(J-523)या विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी करून जिल्हा यादीत स्थान पटकावले. तसेच पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत एकूण तीन विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. त्यामध्ये कु.समृद्धी दत्तात्रय डुकरे (J-93) कु.स्वरा सिद्धराज बोराडे(J178), कु. सक्षम अनिल घोडेकर(J-577) या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या स्कूलच्या आदर्श प्राचार्या श्रीमती मेरी फ्लोरा डिसूजा, उपप्राचार्या रेखा आवारी, शिक्षिका सौ ज्योती जाधव, सौ सोनीका नायकोडी, सौ प्रज्ञा घोडेकर, श्रीमती सुप्रिया मंडलिक, सौ सुषमा फलके श्रीमती सुषमा भोर, श्री. संतान आसंगी , सौ प्रज्ञा बारवे यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या या उत्तुंग यशाबद्दल आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. तुकाराम नामदेवराव काळे, उपाध्यक्ष मा. एडवोकेट श्री. संजय दत्तात्रय आर्वीकर,संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. सुरेश शेठ गजानन शेठ काळे, संस्थेचे मानद सचिव माननीय श्री विश्वासराव अरविंद काळे, सहसचिव श्री प्रशांत बाळासाहेब काळे, वसतिगृह कमिटीचे चेअरमन माननीय श्री. सूर्यकांत फुलचंद गांधी,संस्थेचे खजिनदार माननीय श्री सोमनाथ भाऊ वसंतराव काळे, विद्यालयाचे चेअरमन माननीय श्री बाळासाहेब काशिनाथ काळे, संस्थेच्या समन्वय समितीचे चेअरमन श्री राजेश कैलास शेठ काळे,संस्थेचे संचालक श्री अजित दत्तात्रय काळे श्री अक्षय रामशेठ काळे श्री वैभव बबनराव काळे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक करून अभिनंदन केले.