सामाजिक
“वैदिक” मंत्राच्या जयघोषत,प्रसिद्ध उद्योगपती “देवेंद्र शाह”यांची सुकन्या चि.सौं. कां,”अक्षाली” व चि.” साकेत” यांचा शुभविवाह सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न…..!!!
ॐ मङ्गलम् भगवान विष्णुः , मङ्गलम् गरुणध्वजः, मङ्गलम् पुण्डरी काक्षः मङ्गलाय तनो हरिः
पारंपारीक रितिरिवाजानुसार मंगल कार्याची आराध्य देवता विघ्नहर्ता “श्री गणेशाला” प्रथम वंदन करून “वैदिक” मंत्राच्या घोषात देव,ब्राम्हण, माता, पिता,संतश्रेष्ठ,वरिष्ठ मान्यवर यांचे शुभाशीर्वाद घेत नातेवाईक व आप्तेष्ठ यांच्या उपस्थितीमध्ये चि. साकेत व चि. सौं कां अक्षाली यांचा विवाह सोहळा मोठया उत्साहात संपन्न झाला.
“साकेत”हे नाव भगवान श्रीकृष्णांना संबोधले जाते ज्यांना आपण या विश्वाचा पालनहार तर सनातन धर्मात यांस ब्रम्ह म्हणतात. तर “अक्षाली” (अक्ष +अली) म्हणजे ज्याचा क्षय होत नाही असे ते देवस्वरूप होय म्हणजेच अनादी काळापर्यंत निरंतर कायमस्वरूपी टिकून राहणारे व ज्याचा क्षय होत नाही (अक्ष -म्हणजेच क्षय न होणारे,अली – म्हणजेच देवस्वरूप ) असे ते म्हणजेच “अक्षाली” होय, भगवान श्रीकृष्ण हे श्री विष्णू यांचे रूप होत त्यांना या ब्रह्मांडाचा निर्माता म्हणजेच “ब्रम्ह” होय . म्हणजे ते जे चिरकाल निरंतर टिकून राहते त्याचा कधीही नाश होत नाही असे “अक्षयब्रम्ह” होय. हे विवाह बंधनात बांधलेल्या वधुवर चि. सौ.कां. अक्षाली व चि. साकेत यांच्या नावातून स्पष्ट होते. “
आपले बंधू धाकटे बंधू “प्रीतम शाह ” यांच्या साथीने, निरंतरपणे प्रचंड श्रम करून, स्वकर्तुत्वाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत,डेअरी व्यवसायात अदभूत गरुड झेप घेत “गोवर्धन” नावाचा सुप्रसिद्ध ब्रॅण्ड निर्माण केला. व भारतात नव्हे, तर भारताबाहेर जगाच्या बाजार पेठेत अनेक देशात,आपलें स्वतंत्र वेगळे वर्चस्व सिद्ध केले. तसेच सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती निरंतर अथक परीश्रम करून अनपेक्षित यश संपादन करू शकतो असा विश्वास पुढील युवा पिढीच्या मनात निर्माण केला.
आशिया खंडात आपल्या व्यवसायच्या माध्यमातून ज्यांना मिल्क मॅन या उपाधीने ओळखले जाते. ते पुणे जिह्यातील आंबेगाव तालुक्याचे सुपुत्र, प्रसिद्ध उद्योगपती “देवेंद्र शेठ” शाह यांची व्दितीय कन्या “अक्षाली” हिने लक्ष्मी च्या रूपाने गुप्ता परिवारातील चि.साकेत यांच्या जीवनात प्रवेश केला. यांचा अदभुत अप्रतिम असा विवाह सोहळा वैदिक मंत्रांच्या जयघोषात दोन्ही कुटुंबातील सांगेसोयरे आप्तेष्ठ नातेवाईक यांच्या उपस्थितीत देव ब्राम्हण माता पिता यांच्या शुभआशीर्वादाने मोठया उत्साहात देशाची संमृद्ध नगरी मुंबई येथे नुकताच पार पडला. या विवाह सोहळ्याप्रसंगी पारंपारीक रितिरिवाजाचे अनुकरण करून राजेशाही थाटात हा विवाह सोहळा संपन्न झाला
दरम्यान या विवाह सोहळ्यानिमित्त व तदनंतर झालेल्या कार्यक्रमात शाह परिवाराच्या आनंदात सहभागी होण्यासाठी सर्वसामान्य व्यक्ती पासून कला, क्रीडा शौक्षणिक तसेच राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर मंडळी उपस्थित होती. शाह परिवाराकडून झालेल्या सर्व कार्यक्रमामध्ये उपस्थित अतिथी चा योग्य सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रसंगी देशाचे कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान, देशाचे माजी कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार, सौ प्रतिभा पवार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे (पाटील ), खासदार सुप्रियाताई सुळे, सौ. किरण ताई वळसे(पाटील), खासदार सुनील तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल,माजी खासदार शिवाजीराव आढळराव (पाटील )मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री बाळासाहेब थोरात,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,माजी आमदार गणेश नाईक आमदार सत्यजित तांबे, आमदार मंगल प्रभात लोढा, आमदार संग्राम जगताप, आमदार अशोकराव पवार, आमदार अतुल बेनके , यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.