आरोग्य

मंचर उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त जागा त्वरित भराव्यात – आंबेगाव तालुका शिवसेना (उद्धव ठाकरे ) पक्षाची मागणी

Published

on

मंचर दि (प्रतिनिधी) येथील उपजिल्हा रुग्णालायात, फिजिशियन, भुलातज्ञ्,,श्रीरोगतज्ञ् यांच्या जागा रिक्त असून त्या त्वरित भरण्यात याव्यात अशी मागणी आंबेगाव तालुका शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे पक्ष ) यांच्याकडून करण्यात आली आहे 

सर्वसामान्य रुग्णाना चांगल्या दर्जाच्या सुविधा मिळाव्यात यासाठी शासनाने मंचर येथे उपाजिल्हा रुग्णालंय कार्यरत केले असून या रुग्णालायात व्यवस्थित सुविधा मिळत नसल्याच्या अनेक ग्रामस्थ्यांच्या तक्रारी आहेत. या ग्रामीण रुग्णालायात खेड,जुन्नर,  आंबेगाव,  शिरूर, संगमनेर आदि भागातून अनेक रुग्ण येतात परंतु या रुग्णाना व्यवस्थित सुविधा मिळत नसल्याची तक्रात करण्यात आली त्याच प्रमाणे काही कर्मचारी येणाऱ्या रुग्णाना विविध तपासांनी करण्यासाठी बाहेरच्या लॅब मध्ये पाठवितात.

 वास्तविक पहाता उपजिल्हा रुग्णालायातच रुग्णाच्या रक्त लघवी यासाह विविध तपासण्यारुग्णालायातच होणे अपेक्षित आहे. परंतु काही कर्मचारी या रुग्णाना येथे सुविधा नसल्याचे सांगत बाहेरून तपासांनी करायला सांगत असल्याचे सांगितले जाते. कोणत्याही रुग्णालायाकडून एखाद्या लॅब मध्ये रक्त अथवा कोणतीही तपास्नी करण्यात आल्यानंतर बाहेरच्या लॅब मध्ये तपासांनी करण्यात सांगितलेल्या वैद्यकीय कर्मचारी यांस खाजगी लॅब ने रुगणाकडून अकारलेल्या रक्कमेतून  खाजगी लॅब कडून सुमारे चालीस ते पन्नास टक्के कमिशन दिले जातं अशी भयावह माहिती आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या  व्यक्तींकडून सांगितले जाते.

या प्रसंगी शिवसेना जिल्हप्रमुख  सुरेश भोर, जिल्हा निरीक्षक  राजराम बाणखेले, तालुका प्रमुख दत्ता गांजाळे, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी संचालक अरुण नाना बाणखेले,मंचर शहर प्रमुख जाधव, महेश घोडके आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version