शैक्षणिक
घोडेगाव इंग्लिश मेडीयम स्कुलच्या “बालचमुंचा रंगला, अनोखा बालदिंडी सोहळा”
घोडेगाव: दि.:-
“पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची तोडूनिया गाठ” : विठ्ठल भक्तीने भरावून विविध अभंग गुणगुणत घोडेगाव येथिल न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्री-प्रायमरी विभागाने”आषाढी एकादशी”निमित्त बाल दिंडीचे आयोजन केले होते.
महाविद्यालयच्या प्री प्रायमरीच्या विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा करून, कपाळावर गंध, गळ्यात तुळशीच्या माळा, खांद्यावर पताका घेऊन, टाळ वाजवत, डोक्यावर तुळस घेऊन ज्ञानोबा, माऊली, तुकाराम अशा घोषणा देत बाल दिंडीमध्ये सहभागी झाले. यावेळी प्री प्रायमरी विभागाच्या सौ सुप्रिया हुले यांनी विद्यार्थ्यांना आषाढी वारी तसेच आषाढी एकादशीनिमित्त माहिती सांगितली.
चिमुकल्याना विठ्ठल भक्तीच्या गोष्टी रुपातून एकादशी चे महत्व समजावून सांगितले. छोट्या वारकऱ्यांची घोडेगाव मध्ये वाजत गाजत “ग्यानबा तुकाराम” च्या जयघोषात छान दिंडी काढण्यात आली . सर्व चिमुकल्यांनी विठ्ठलाच्या नाम गजरात टाळ वाजवून दिंडीचा आनंद लुटला.आषाढी एकादशी कशी? साजरी केली जाते, दिंडी कशी? काढली जाते हे मुलांना या उपक्रमातून पटवून दिले.
दरम्यान आपलें मनोगत व्यक्त करताना संस्थेचे चेअरमन बाळासाहेब काळे, म्हणाले कि, चिमुकल्या वारकऱ्यांचे तसेच महाविद्यालयात राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. बाल वयामध्येच आपली संस्कृती व अध्यात्माचे अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन करण्याचे काम आपल्या विद्यालयातील शिक्षक करत आहेत आणि खरे तर ही काळाची गरज आहे. असेच नाविन्यपूर्ण उपक्रम विद्यालयात राबवावेत, त्यांच्यावर उत्तम संस्कार करून त्यांना उत्तम नागरिक म्हणून घडवण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे प्रतिपादन संस्थेचे खजिनदार सोमनाथ काळे यांनी केले.
आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष श्री तुकाराम काळे, उपाध्यक्ष अँड संजय आर्वीकर, कार्याध्यक्ष सुरेश शेठ काळे, सचिव,विश्वास काळे, संस्थेचे खजिनदार,सोमनाथ काळे, संस्थेची सहसचिव,प्रशांत काळे,विद्यालयाचे या उपक्रमासाठी विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती मेरी फ्लोरा डिसोजा,उपप्राचार्या श्रीमती रेखाआवारी, संगीत शिक्षक श्री.गंगाराम तनपुरे, श्री चेतन पोखरकर सर, श्री. समीर मुजावर सर, श्री प्रवीण नायकोडी सर विद्यालयाचे शिक्षकेतर सेवक वर्ग, इयत्ता आठवीच्या गाईड पथकातील सर्व विद्यार्थीनी यांचे बहुमोल सहकार्य लाभले. सौ स्मिता वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले व सौ.स्वाती शेटे यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.