शैक्षणिक

“केवळ वृक्षारोपण करून चालणार नाही” तर,झाडांची लहान मुलांसारखी जोपासना गरजेची : -भा.ज.पा. जिल्हा उपाध्यक्ष राजेश काळे 

Published

on

घोडेगाव: दि-  सर्वत्र होत असलेली नैसर्गिक हानी पहाता, पर्यावारणाचा समतोल राखण्यासाठी  वृक्ष लावून त्यांचे  संवर्धन करणे गरजेचे आहे व त्यासाठी वृक्ष लावून त्यांची लहान मुलांप्रमाणे जोपासाना करून त्यांना वाढविले पाहिजे असे प्रतिपादन स्कुल कमेटी चेअरमन व पुणे जिल्हा भाजपा उपाध्यक्ष  राजेश काळे यांनी केले.

https://bobhatanews.in/wp-content/uploads/2024/07/VID-20240716-WA0077.mp4

घोडेगाव येथील आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचलित न्यू इंग्लिश मीडियम स्कूल च्या  स्काऊट गाईड विभागाच्या वतीने घोडेगाव येथे टेकडीवर  वृक्षारोपणाचा  कार्यक्रम पार पडला. त्यावेळी काळे बोलत होते. ते पुढे म्हणाले कि, जगतगुरू संत तुकारम महाराजानी “वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे” या अभंगातून वृक्षाचे मानवी जीवनातील महत्व समाजावून सांगितले आहे प्रत्येक झाडामध्ये काही ना काही औषधी गुणधर्म असतात झाडाचा प्रत्येक भाग हा आपल्या कामी येत असतो. वृक्ष लावून लहान मुलासारखी त्याची काळजी घेतली पाहिजे, त्याला जे काही खत पाणी लागेल ते घातले पाहिजे, त्याची जोपासना केली पाहिजे. जोपर्यंत झाड मोठे होत नाही तोपर्यंत त्याची काळजी घेतली पाहिजे,

दरम्यान नागरिकांना वृक्षाचे महत्व पटवून देण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी झाडे हातात घेऊन, घोडेगाव शहरामधून वृक्षदिंडी काढून पर्यावरण व वृक्षांचे संगोपन कसे करावे या संदर्भात घोषणा देत  येथील बी.डी. काळे महाविद्यालयाच्या मागील बाजूस असणाऱ्या मैदानाच्या कडेला तसेच तेथील डोंगराच्या उतारावर  वृक्षारोपण केले.वृक्षारोपणासाठी घोडेगाव येथील वनविभागाच्या सहकार्याने महाविद्यालयाने विविध जातीची  झाडे उपलब्ध करून करून देण्यात आली होती.

 यावेळी बी.डी.काळे महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.वाल्हेकर सर , श्री.जगताप सर, श्री.गव्हाळे सर, न्यू इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्राचार्या श्रीमती मेरीफ्लोरा डिसोजा, उपप्राचार्या श्रीमती रेखा आवारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विद्यालयाच्या शिक्षिका श्रीमती सुषमा थोरात यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.  क्रीडाशिक्षक श्री.रोहित तळेकर यांनी वृक्षरोपणाविषयी माहिती सांगितली. सौ.संगीता कर्पे यांनी आभार प्रदर्शन केले. स्काऊट गाईडच्या या सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्या श्रीमती मेरीफ्लोरा डिसोजा, उपप्राचार्या श्रीमती रेखा आवारी, क्रीडा शिक्षिका सौ.ज्योती रोकडे, श्री रोहित तळेकर, तेजश्री यंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version