राजकीय
शरद पवारांचा, दिलीप वळसे पाटलाच्या मतदार संघात दौरा,कोणता मोहरा लागणार गळाला?
मंचर दि -(प्रतिनिधी) आंबेगाव तालुक्यात (उद्या दि 20 रोजी) राज्याचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांचा जनता दरबार होत असून, या जनता दरबाराच्या माध्यमातून ते राज्याचे सहकार मंत्री दिलीप पाटील यांना घेराण्यासाठी आंबेगाव तालुक्यातून कशाप्रकारे मोर्चे बांधणी करतात? व तालुक्यातील कोणता नेता,पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार, या चर्चाना उधान आले आहे.
मागील वर्षी राज्याच्या राजकारनात पक्ष फुटीचा दुसरा मोठा राजकीय भूकंप झाला. राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांना धक्का देत संपूर्ण पक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कांग्रेसच्या काही आमदारांनी आपली वेगळी चूल मांडली व युती सरकार सोबत हे आमदार गेले यात शरद पवार यांचे मानासपुत्र म्हणून ओळखले जाणारे राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देखील शरद पवार यांची साथ सोडत सरकारमध्ये प्रवेश केला.
दरम्यान विश्वासातील महत्वाची माणसे साथ सोडून गेल्यानंतर देखील पवार यांनी माघार ना घेता पुन्हा नव्याने समीकरणे जुळवत नवीन पक्षाची बांधणी केली व लोकसभा निवडणुकामध्ये अनपेक्षित यश मिळविले. पुढील काळात विधान सभेच्या निवडणुका तोंडावर आल्या असून या निवडणुकीत आपलें जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी शरद पवार यांनी कंबर कसलेली दिसते “म्हणतात ना, लांबच्या माणसापेक्षा जवळच्या माणसाने रस्त्यात साथ सोडल्यास जास्त त्रास होतो” शरद पवार यांचे विश्वासू म्हटल्या जाणाऱ्या महत्वाच्या विश्वासू शिलेदारंमध्ये आंबेगाव तालुक्याचे आमदार व राज्याचे सहकार मंत्री वळसे पाटील हे ओळखले जातात.
दरम्यान पवारांसारखा मुत्सद्दी “गुरु” आपल्या शिष्यास निवडणुकीच्या आखाड्यात कोणता डाव टाकून धोबी पाचड करतो कि चेला गुरुला वरचढ ठरतो हे पहाणे नाजिकच्या काळात महत्वाचे ठरणार आहे. तसेच राष्ट्रवादी पक्षात फुट पाडून शरद पवार यांना सोडून सरकार मध्ये शपथ घेणाऱ्या त्या नऊ नायकाच्या विरोधात पवार यांनी मोर्चा उघडाला असल्याचे दिसत असून त्यात वळसेपाटील यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा असून नजीकच्या काळात उमेदवार कोणीही असो परंतु आंबेगावाचा सामाना पवार विरुद्ध वळसे पाटील होणार आहे. या चर्चाना तालुक्यात प्रचंड उधान आलेले आहे.