अध्यात्मिक

पोखरी येथील गोरक्षनाथ आश्रमावर गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

Published

on

घोडेगाव दि (जोशी जितेंद्र यांजकडून) योगी बेलनाथ महाराज गुरू श्री. योगी संपतनाथ महाराज – श्री. गुरू गोरक्षनाथ   आश्रम राजेवाडी ता. आंबेगाव) येथे गुरूपौर्णिमेचा कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न झाला.   


गुरु:ब्रम्ह:गुरु: विष्णू: गुरु: देवो: महेश्वर, गुरु:साक्षात परब्रम्ह: तसमे श्री गुरु्वे नमः  या विश्वाच्या निर्मात्याने माता पिता यांना प्रथम गुरु त्यानंतर जीवनाचा अर्थ समाजून घेण्यासाठी गुरु आवश्यक आहे. गुरु जो अज्ञाणाचा अंधःकार दूर करून आपल्या जीवनाला एक प्रकाशमय मार्ग दाखवितो. जो गुरु पूर्ण प्रामाणिक पणे त्या सद् गुरुला शरण गेलो. त्यांच्या पासून आपल्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच व्यास(गुरु) पौर्णिमेनिमित्त सर्वत्र प्रत्येक नागरिक आपल्या गुरुला अभिवादन करण्यासाठी या दिवसांची वाट पहातो. गुरु च्या चरणाची (पाद्य ) पूजा करूनच तो पुढील कार्याची सुरुवात करतो.

. आंबेगाव तालुक्यातील राजेवाडी येथे श्री गोरक्षनाथ  आश्रम येथे महंत बेलनाथ महाराज यांच्या आश्रमावर देशाच्या कानकोपऱ्यातून असंख्य शिष्यगण उपस्थित होते   गुरुपौर्णिमा निमित्ताने शेकडो  भाविक ग्रामस्थ व बाबांच्या शिष्य मंडळाने महाप्रसाद व गुरुपुजनाचा आनंद घेतला. त्या निमित्त अनेक भजन मंडळ, साधुसंत उपस्थित होते.  गुरू पौर्णिमेनिमित्त देवाचा अभिषेक, होम हवन, कन्या पूजन, रुद्राक्षाचे वाटप, गुरू पूजन व तसेच सुंदरकांड पाठ देखील करण्यात आला. महिलांसाठी आश्रमातील माहेर हा उपक्रम राबवून त्यांचा सन्मान करण्यात आला. बेलनाथ महाराज ह्यांनी गुरू उपदेश करत गुरुबद्दल माहिती दिली.


.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version