सामाजिक
समाज्यातील गरीब महिला, वृद्ध यांच्या उन्नतीसाठी काम करावे, या इच्छेतून “अनुसया महिला उन्नती केंद्राची” स्थापना -किरणताई वळसे (पाटील)
मंचर दि (प्रतिनिधी ) समाज्यासाठी काम करावे अशी माझी मनापासुन इच्छा असतें त्यामुळे गरीब, गरजू महिलांना मदतीचा हात मिळावा हाच उद्देश डोळ्यांसमोर ठेऊन अनुसया ऊन्नती केंद्राची स्थापना केली असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या किरणताई वळसे पाटील यांनी केले
कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर (ता आंबेगाव)आवारात असणाऱ्या शरद चंद्र पवार सभागृहात झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या यावेळी तहसीलदार संजय नागटिळक, भीमाशंकरचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे पाटील, सुषमाताई शिंदे, माणिकताई गावडे, अरुणाताई थोरात, उषाताई कानडे, प्रिया बाणखेले, शैलजाताई ढोबळे, सुनील बाणखेले, अरुणराव गिरे, रवींद्र करंजखेले, अक्षदा शिंदे, सुहास बाणखेले, प्रेम थोरात, पुष्पलता जाधव, मोनिकाताई भालेराव, वैशाली बेंडे, आरती थोरात, प्रितीताई चिखले, ललिताताई चिखले, वेणुताई खरमाळे, सिताबाई चासकर, शहानूर भाभी, शेखर चिखले, अमोल वायाळ, वैभव वायाळ, शिलाताई बोदडे, व आदी पदाधिकारी तसेच अनुसया महिला उन्नत्ती केंद्र व अनुसया महिला सहकारी पतसंस्थे चे सर्व पदाधिकारी, कर्मचारी, योजनेचे लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपलें मनोगत व्यक्त करताना किरणताई पुढे म्हणाल्या कि, राजकारण हे पक्षाच्या माध्यमातून होतच राहते परंतु सर्व सामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लागणे आवश्यक आहे तालुक्यातील सर्वसामान्य गरीब वृद्ध महिलांनाचे असणारे प्रश्न मार्गी लावावेत या उद्देशाने 2008 -09 या काळात सहकार मंत्री वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनातून “अनुसया महिला उन्नती केंद्राची ” स्थापना केली. या माध्यमातून सर्वसामान्य वृद्ध गरीब न्याय मिळावा यासाठी राज्य शासनाच्या संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजना, आदीसह अनुसया महिला उन्नती केंद्र, मंचर यांच्या सहकार्याने वैयक्तिक लाभच्या योजना, रेशनिंग कार्ड विविध दाखले,आजी आजोबा,परितक्ता-निराधार महिला, बाधित लाभार्थी आदी योजना अनुसया महिला केंद्राच्या माध्यमातून मदत केली जातं आहे.अनेक गरजूमहिला व वृद्ध आजी आजोवांची शासकीय कामे केल्यानंतर या अनेक गरजवंतांच्या चेहऱ्यावरील आनंद व त्यांचे आशीर्वाद आपणाला मोठ समाधान देऊन जातो.
दरम्यान अनुसया महिला उन्नती केंद्र, मंचर यांच्या सहकार्याने राज्य शासनाच्या संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजना अंतर्गत मंचर, अवसरी खु. व कळंब परिसरातील २४८ पात्र लाभार्थ्यांना ‘मंजूरी आदेश’ वाटप कार्यक्रम मंचर येथे संपन्न झाला. यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.