सामाजिक
बळीराजासह, विविध क्षेत्रातील उद्योजकांना नवी दिशा देणारा तेजस्वी “प्रकाश” मय आधारवड…!!!
मंचर दि. (प्रतिनिधी)- जागतिक पातळीवर नावाजलेल्या “पराग उद्योग” समूहाचे मार्गदर्शक, तसेच आपल्या नवनवीन कल्पनेतून शेतकरी तसेच व्यापारी जगतास नवी ऊर्जा देणारे प्रसिद्ध व्यापारी “प्रकाश शाह” नावाचा आधारवढ हारपल्याने सर्वस्थरातून हळहळ व्यक्त होत आहे.
उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड, जुन्नर, शिरूर, आंबेगाव परिसरात ऐशीच्या दशकात ज्यांनी सिमला परिसरातून “बटाटा” बियाणे उपलब्ध करून देऊन,शेती व्यवसायास वेगळी चालना दिली. तसेच त्यासोबत स्थानिक व्यापाराला एक नवी दिशा दाखविली. व्यापारात, उद्योगात आपल्या मुलांप्रमाणे इतरही नवउद्योजकांना ज्यानी, मोलाचे बहुमोल मार्गदर्शन केले व आपल्या अथांग विचारसरणीतून नवनवीन कल्पनाची निर्मिती करीत उद्योग व्यवसायात नवीन ऊर्जा आणली. जसे आकाशाप्रमाणे अथांग असलेल्या आपल्या विचार सरणीतून सर्वत्र तेजस्वी प्रकाश निर्माण करणारे मंचर येथील प्रतिष्ठित व्यापारी “प्रकाश शाह” हे म्हणजे सर्वांच्या दृष्टीने “आधारवड” होते. त्यांच्या जाण्याने सर्व स्थरातून हळहळ व्यक्त केली गेली.
“ज्याचे कर्तृत्व प्रचंड महाकाय आकाशाएव्हढे असते तो (प्र+ आकाश = प्रकाश) तसेच अज्ञाणाचा अंधकार दूर करीत, आपल्या ‘तेजस्वी’ ज्ञानाने सर्वांना अविरत प्रेरणा देणारा तो हि “प्रकाश” च होय
सुमारे १९८० सालाचे काळात दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जाणाऱ्या आंबेगाव तालुक्यातील शेतकरी वर्ग पिढीजात पारंपारीक पद्धतीने शेती करून आपला उदार निर्वाह करीत होता, यात बदल घडविण्याच्या हेतूने, कमी पाण्यात दर्जेदार वाढीक उत्पादन मिळावे या विचारणे प्रेरित होऊन, प्रकाशभाई शाह यांनी येथील भौगोलिक स्थितीचे निरीक्षण करून या भागातील शेती उत्पादनात नवीन “वाण” आणून आर्थिक उत्पन्न वाढवावे या दृष्टीने मोलाचे प्रयत्न केले.
दरम्यान या परिसरातील शेती उत्पादन क्षेत्रात पारंपारीक असलेला “बळीराजा” समृद्ध व्हावा,या दृष्टीने प्रकाश भाई यांनी आपल्या शोध वृत्तीच्या माध्यमातून देशाच्या बाजार पेठेत विविध राज्यात असणाऱ्या विविध जातींच्या पिकाचा अभ्यास केला. व त्या माध्यमातून, दरवर्षी पारंपारीक पद्धतीने बाजरी, ज्वारी, भुईमूग, अशी पिके घेणाऱ्या खेड, जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यास नवीन पीक उत्पादांनासाठी उपलब्ध केले. त्याचप्रमाणे हे नवीन पीक निवडताना, प्रकाशभाई यांनी येथील जमिनीची गुणवंत्ता पाहून या परिसरात सिमला प्रदेशातील ” बटाटा” बियानाचा वाण आंबेगाव तालुक्याच्या बाजारपेठेत आणला. त्याकाळात उच्च दर्जाचा योग्य “बटाटा बियाणे” येथील शेतकऱ्यांना देऊन प्रकाशशेठ यांनी शेती क्षेत्रात उत्तर पुणे जिल्ह्यात त्याकाळात क्रांतीच घडवून आणली असे म्हणणे वावागे ठरणार नाही.
शेतकरी वर्गाचे हित जोपासणे व शेतीवर आधारीत उद्योग उभे करण्यात शाह परिवार अग्रेसर ठरला आहे. शेती उत्पादणास एक नवी दिशा देणाऱ्या प्रकाशभाई यांनी नव्वद च्या दशकात दुधाचे अतिरिक्त असलेले उत्पादन पहाता त्या काळात असलेली दुधाच्या खाडा पद्धतीमुळे या भागातील दूध व्यवसाय अडचणीत आला होता.या काळात आपला जेष्ठ मुलगा “देवेंद्र” यांना योग्य मार्गदर्शन करीत दूध व्यवसायाची संकल्पना राबवत प्रकाश शाह यांनी दूध डेअरी व्यवसायाची प्रगतीसाठी प्रयत्न केले. यात प्रकाशशेठ यांचा दुसरा मुलगा “प्रीतम” यांनीही मोलाची साथ दिली. आपला मुलगा देवेंद्र यांच्या सातत्य पूर्ण प्रयत्नातून हा व्यवसायाचे एका मोठ्या कंपनीमध्ये रूपांतर झाले असून गोवर्धन या नावाने देशाच्या नव्हेतर जगाच्या बाजारात या कंपनीने नाव लौकिक निर्माण केला आहे. स्थानिक लोकांच्या उन्नतीच्या दृष्टीकोनातून निर्माण झालेल्या या उद्योगामुळे खेड जुन्नर आंबेगाव तालुक्यातीलच नव्हेतर पुणे नगर नाशिक आदी जिल्यातील लाखो शेतकऱ्यांना दुधाच्या माध्यमातून हक्काचे उत्पन्न मिळवून देण्यासाठी डेअरी उद्योग निर्माण केला.
परिस्थिती कशीही असो त्यातून यशस्वी रित्या मार्ग कसा काढावा व त्यातून व्यापार यशस्वी कसा करावा? याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्रकाशशेठ होत. त्यांच्या जाण्याने त्यांच्या हितचिंतकच्या नव्हे तर अनेकांच्या जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे व ती पुन्हा भरून येणे दुर्लभच आहे. असे म्हणणे वावगे ठरणार नाही.