सामाजिक

“स्वार्थी असुयेपोटी”, समाज विघातक वृतींकडून “गोवर्धन कंपनीला” बदनाम करण्याचा डाव?

Published

on

मंचर दि. (प्रतिनिधी) आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथील आदिवासी आश्रम शाळेत अळया सापडलेली दुधाची पॅकेट ही उंदरांनी  कुरतडलेली होती. असे आश्रम शाळेचे मुख्याध्यापक यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे परंतु स्थानिक पातळीवरील  वैयक्तिक असुयेपोटी अथवा संवग प्रसिद्धीसाठी “गोवर्धन” कंपनीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे.

आदिवासी संघटना “बिरासा ब्रिगेड” चे कार्यकर्ते यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे कि, घोडेगाव येथील आश्रम शाळेत गेले असता त्याठिकाणी स्टॉक रूमला भेट दिली व त्याठिकाणी असलेल्या गोवर्धन टेट्रा पॅक मधील दुधात  अळ्या असल्याचे निदर्शनास आले असल्याचे म्हटले आहे. या निवेदनात त्यांनी हेही म्हटले कि चांगल्या पॅक मध्ये सुद्धा अळ्या आढळून आल्या परंतु शाळेचे मुख्याध्यापक यांनी आपल्या लेखी निवेदनात असेही म्हटले आहे कि, उंदरांनी कुरतडलेली पॅक वगळता इतर कोणत्याही पॅक मध्ये अळ्या आढळलेल्या नाहीत, तसेच त्यांनी निवेदनात इतर पॅक फोडल्यानंतर त्यात सूक्ष्म अळी दिसली असेही म्हटले आहे परंतु एखादी सूक्ष्म वस्तू पहावायाची असल्यास त्यास मायक्रोस्कोप वरून तपासणी केल्यासच ती वस्तू कशी आहे. हे समजू शकते तर मग त्या दुधाची  आरोग्य अधिकाऱ्यांकडून तपासणी होणे  आवश्यक होते. परंतु शाळेच्या मुख्याध्यापक अथवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तसेही केले नाही. अगोदरच्या काळापासून पदाधिकाऱ्यांच्या भेटी पर्यंत  ज्या  कोणत्याही मुलांनी तेथील  दूध प्यायले त्यामुळे कोणत्याही  मुलाकडून आरोग्याविषयी तक्रार करण्यात आलेली नाही.असेही मुख्याध्यापक यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान  बिरासा ब्रिगेड चे पदाधिकारी ज्या दिवशी आश्रम शाळेत गेले होते त्याचे दोन दिवस अगोदर उंदराने कुरतडलेली  चार ते सहा पाकिटे बाजूला ठेवून देण्यात आली होती. याचाच दुसरा अर्थअसाही होऊ शकतो कि, उंदरांनी कुरतडलेली टेट्रापॅक दुधाची पाकिटे  खराब होऊन त्या खराब पाकिटात अळ्या निर्माण झाल्या  असल्याची माहिती  अगोदरच या कार्यकर्त्यांना होती. म्हणूनच काही विघटक प्रवृत्तीनी कंपनीचे नाव बदनाम करून आपला वैयक्तिक स्वार्थ अथवा सवंग प्रसिद्धीच्या हव्यासापोटी ही जाणीवपूर्वक कृती या कार्यकर्त्यांनी केली असावी अशी शक्यता नकारता येत नाही. कारण कंपनीचा मूळप्लॅन्ट हा आंबेगाव तालुक्यातच असून स्थानिक मतभेदामुळे काही विघातक शक्तींनी  जाणीव पूर्वक  नियोजन करून कंपनीचे नाव बदनाम करण्याचा हा डाव असावा अशी चर्चा तालुक्यात सर्वत्र सुरु आहे. 

  “टेट्रा पॅकमध्ये विक्री केल्या जाणाऱ्या दुध सुरक्षित असून त्यात भरपूर पोषक तत्व  मोठ्या प्रमानावर असतात. उच्च तापमानावर हे दूध गरम करून काही थंड करून हे टेट्रा पॅकिंग केले जाते. टेट्रा पॅक मध्ये असलेले दूध सुरक्षित व आरोग्यदायी मानले जाते. या संदर्भात जागतिक स्तरावर टेट्रा पॅक चे नामांकन आहे”. 

दरम्यान “गोवर्धन”कंपनीचे देशाच्याच बाजार पेठेत नव्हे तर संपूर्ण जगाच्या बाजार पेठेत मोठ्या प्रमानावर दुग्धजन्य पदार्थांची मोठ्या प्रमाणात  विक्री केली जातं आहे. त्यामुळे बिरासा ब्रिगेड च्या नावाखाली जाणीव पूर्वक कंपनीची प्रतीमा खराब करण्याचा प्रयत्न काही समाज विघातकाकडून केला जातं असावा असेही अनेक जाणकारांचे मत आहे.

 दरम्यान कंपनी व्यवस्थापनाने या खोडसाळ कृत्याची दाखल घेतली असून काही व्यक्तींनी स्वार्थी वृत्ती व असुयेपोटी केलेल्या बदनामी बद्दल न्यायालयात दाद मागणार असल्याचेही समजते. 

1 Comment

  1. हितचिंतक

    August 6, 2024 at 12:57 pm

    सर्वसामान्य शेतकऱ्याचे दूध पंचवीस रुपये भावाने घेऊन आदिवासी भागात ते दूध आश्रम शाळेत 132 रुपये च्या भावाने मलिदां गँग विकत आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या टाळू वरचे लोणी खाण्याचे काम गोवर्धन करत आहे
    जर आश्रम शाळेचे दुध्यक्ष बत्तीस रुपयांनी विकले जात असेल तर त्यावर प्रक्रिया करण्यासाठी किती खर्च येत आहे आणि मग शेतकऱ्याचे दूध फक्त पंचवीस रुपये भावाने घेऊन 107 रुपये प्रॉफिट फक्त गोवर्धन समूहाला होत आहे
    आदिवासी भागातील शेतकऱ्यांनी गायी घेतल्या आणि आदिवासी भागातील शेतकऱ्यांच्या पोरांना त्या गायचा दूध पिण्यासाठी घातलं तर तिची शेतकऱ्याला देखील उच्च रेट मिळू शकतो या कारणाने सर्वसामान्य शेतकरी आणि गोवर्धन च्या मध्ये मलिदा गॅंग सक्रिय झालेली आहे त्या मलिदा गँगचा भांडाफोड होईल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version